Home » What is Pegasus Spyware and its threat to you! | पेगासीस स्पायवेअर चा संभाव्य धोका टाळण्यासाठी वाचा हा ब्लॉग..

What is Pegasus Spyware and its threat to you! | पेगासीस स्पायवेअर चा संभाव्य धोका टाळण्यासाठी वाचा हा ब्लॉग..

Reading Time: 4 minutes

आहे ना गोंधळात टाकणारा प्रश्न! चला तर मग जाणून घेऊया, काय आहे पेगासीस?

०१) पेगासीस मुळे संसदेत गदारोळ!?

संसदेचे मान्सून अधिवेशन पहिल्याच दिवशी गदारोळात पार पडले. दोन्ही सभागृह तहकूब करावे लागले. त्याचे कारण म्हणजे, रविवारी संपूर्ण जगात पेगासीस हेरगिरी प्रकरण उघड झाल्याने सोमवारी संसदेच्या आत व बाहेरसुद्धा गोंधळ उडाला.

नेमके काय झाले जाणून घेण्यासाठी खालील विडियो पाहा 👇

०२) नेमके प्रकरण आहे तरी काय?

जागतिक सहयोगी तपासणीतून असे उघडीस आले की, इस्राईल मधील कंपनी एनएसओ ग्रुपच्या (NSO Group) पेगासीस स्पायवेअरने भारतातील ३०० हून अधिक मोबाईल नंबरला लक्ष्य केले आहे. ज्यामध्ये सरकारच्या काही मंत्री व विरोधी पक्षातील काही नेते आणि पत्रकार तसेच काही व्यापारी यांचा देखील समावेश आहे. सरकारवर पाळत ठेवल्याचा आरोप मंत्र्याकडून केला गेल्याने, संसदेत गदारोळ उडाला!

०३) नेमके पेगासीस (Pegasus spyware ) व्हायरस आहे तरी काय?

पेगासीस हा इंटरनेट वरील व्हायरसचा एक प्रकार आहे आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो लोकांच्या मोबाईल द्वारे त्यांची हेरगिरी करतो. हे पीबीएनच्या अवाहालावरून समजते. पेगासीस हे एक लिंक पाठवते आणि समजा वापरणाऱ्याने त्यावर जाऊन ती ओपन केलीच तर, त्याच्या मोबाईल मधील सगळी माहिती पेगासीस कडे जाते.

तुम्ही whatsapp, facebook messenger वापरतच असाल, त्यावर सुद्धा त्यांची नजर असेल, एकदा का तुम्ही ती लिंक ओपन केली तर, त्यांचे  सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल केले जाईल व कायम तुमच्यावर लक्ष ठेवून असेल. तुम्ही कुठे जाता हे सुद्धा मोबाईल कॅमेरा द्वारा लक्ष ठेवले जाऊ शकते, blackmail सुद्धा केले जाऊ शकते.

०४) कोणी आणली माहिती जगासमोर?

एनएसओ ग्रुप (NSO Group)  हि एक सायबर सिक्युरिटी कंपनी आहे. जी हेरगिरी तंत्रज्ञानात अग्रेसर आहे. जगभरातील सरकार आणि कायद्याची अंबलबजावणी करणाऱ्या ज्या राष्ट्रीयकृत संस्था आहेत, त्यांना गुन्हे आणि दहशतवाद विरोधी लढा देण्यासाठी मदत करण्याचा दावा करते.

ही ४० देशांमध्ये राष्ट्रीयकृत गुन्हे संस्था व ६० गुप्तचर, लष्करी आणि कायद्याची अंबलबजावणी करणारी संस्था म्हणून काम करते. ते करत असताना गोपनीयतेचा हवाला देत त्यांची माहिती कोणालाच सांगत नाही.

०५) नेमका सायबर हल्ला कसा केला जातो-

सायबर हल्ला म्हणजे, तुम्ही जे इंटरनेट वापरता, ते इंटरनेट हे एका आयपी अड्रेस शी (IP Address) लिंक असते. हल्ला करणारा हा आधी तुमचा आयपी अड्रेस शोधून मग तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यामध्ये तो व्हायरस टाकतो आणि त्या लिंक वर जाऊन तुम्ही जर ओपन केली, तर तुमच्या मोबाईल मधील सगळी माहिती हल्ला करणाऱ्याकडे जाते.

जगामध्ये ह्या आधी सुद्धा अनेक हल्ले झाले आहेत. फक्त हल्ला करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजेच, त्याचे सुद्धा प्रकार पडतात ते आपण बघू.

Pegasus spyware, virus, Israil,
Photo by Mikhail Nilov from Pexels

०६) सायबर हल्ला करण्याच्या पद्धती-

मालवेअर (Malware)
फ्हीशिंग (Phishing)
एसक्यूएल इंजेक्शन हल्ला (SQL Injection Attack)
क्रॉस साईट स्क्रीप्तींग (Cross site scripting (XSS))
डेनिअल ऑफ सर्विस (Denial of service)

०७) जगातील १० मोठे सायबर हल्ले त्यांचा इतिहास.

The destruction of the Melissa virus (1999)

Nasa cyber attack (1999)

The 2007 Estonia cyber attack (2007)

A cyber attack on sonys play station network. (2011)

Adobe cyber attack.

The 2014 cyber attack on yahoo. (2014)

Ukraines power grid attack. (2015)

2017 Wannacry Ransomeware cyber attack. (2017)

A cyber attack on marriot hotels went unnoticed for years. (2018)

The biggest password leak yet.(2021)

०८) सायबर गुन्हे व कायदा:

भारतात ०९ एप्रिल २००९ रोजी सायबर पोलिस ठाणे कार्यरत झाले. ही शाखा वेबसाईट हॅकिंग, सायबर स्टॉकिंग, सायबर पॉर्न, इमेल, क्रेडीट कार्ड गुन्हा, सॉफ्टवेअर चोरी, ऑनलाइन फसवणूक आणि इंटरनेट गुन्हा तपासणीशी संबधित आहे.

सायबर गुन्हा घडून आल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा २००० हा लागू होतो. यामध्ये हॅकिंग, इंटरनेटवरच्या अश्लील गोष्टी व मजकुरांचे प्रकाशन या गोष्टी घडून आल्यास गुन्हा नोंद होऊ शकतो.

०९) शिक्षेची तरतूद

या कायद्यात संगणक बाबतीत सगळ्या गोष्टी म्हणजे, अधिकार देणे-घेणे, सॉफ्टवेअरचे खरेदी नेटवर्क याबाबत नियमावली तयार करण्यात आली असून या कायद्यात कलम ६५ नुसार कॉम्प्युटर माध्यम म्हणून वापर करणाऱ्यास शिक्षेची तरतूद आहे. अशा हॅकरला तीन वर्ष कारावास अथवा २ लाख रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षेस तो पात्र ठरू शकतो.

नजीकच्या काळात जगामध्ये इंटरनेटचा सऱ्हास वापर वाढत चालला आहे. त्यामुळे सायबर हल्ले सुद्धा वाढले आहेत. तर, त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे! जसे की, –

०१) अनोळखी व्यक्तीला माहिती देऊ नये.
०२) फसवणूक फोन वरून बँकेची माहिती गोळा करण्यात येऊन तुमच्या खात्यातून पैसे हडप केले जाऊ शकतात! म्हणून, तुम्ही अशा कोणत्याही  व्यक्तीचा फोन आला आणि त्याने तुमची माहिती मागितली तर, देऊ नका. तसेच फ्रॉड झाल्याचे कळताच तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवा.
०३) तुमच्या मोबाईल मध्ये खूप संदेश (SMS) येत असतात. “ह्या लिंक वर click करा, तुम्ही बक्षीस जिंकले आहात!” तर, त्यावर तुम्ही क्लिक करू नका. तुम्ही गंडवले जाऊ शकता. सहसा अशा गुन्हात चोर लवकर सापडत नाही. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींपासून लांबच राहा.
०४) कोणालाही तुमच्या एटीएम (ATM) चा पासवर्ड सांगू नका व कोणाला तो वापरायला देऊ नका.
०५) फ्री च्या वस्तू घेण्याच्या नादात फसव्या अमिषाला बळी पडू नका.
०६) सायबर हल्लामध्ये तुमचे नुकसान झाल्यास, २४ तासाच्या आत तुम्ही गुन्हा नोंदवू शकता.

काळजी घ्या, फसव्या अमिषाला बळी पडू नका!

तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर, तुमच्या प्रतिकिया जरूर कळवा.

अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.


लेखक

विशाल नवनाथ वाघ

लेखक बी. ई. इलेक्ट्रोनिक्समध्ये शिक्षण घेत आहेत.

अनेकवचन: 5 thoughts on “What is Pegasus Spyware and its threat to you! | पेगासीस स्पायवेअर चा संभाव्य धोका टाळण्यासाठी वाचा हा ब्लॉग..”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!