Home » Is Watching Porn illegal in India? | पॉर्न बघितले तर होणार अटक?
handcuffs, caught, crime-921290.jpg

Is Watching Porn illegal in India? | पॉर्न बघितले तर होणार अटक?

Reading Time: 3 minutes

फेब्रुवारीच्या उन्हाळ्यातील विषय परत एकदा राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रकाशझोतात आला आहे. १९ जुलै च्या दिवशी रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांच विभागातील प्रॉपर्टी सेल कडून ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात आता पर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आल्याचे समजते.

# भारतात “पॉर्न” साईट्स बॅन आहेत?

पॉर्न” हा विषय २०१५ पासून उजेडात आल्याचे समजते. जेव्हा, त्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिका कर्त्यानुसार महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे “पॉर्न” मुळे घडत असल्याचे नोंदवले गेले होते. त्यानंतर शासनाकडून ८५७ पॉर्न साईट्स बॅन करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर समाजमाध्यमातून सरकारवर करण्यात आलेल्या टीकांमुळे ती बंदी हटवण्यात येऊन आता फक्त चाईल्ड पोर्नोग्राफीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

# काय आहेत तरतूदी?

“पॉर्न” विषयी तरतूद असणारे कायदे –

०१) भारतीय दंड संहिता, १९६०
०२) माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००
०३) महिलांचे निर्विकार प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा (Indecent Representation of Women [Prohibition] Act), १९८६
०१) भारतीय दंड संहिता, १९६० –

हा महत्वाचा गुन्हेगारी विरोधी कायदा आहे. कलम २९२, कलम २९३ अंतर्गत पोर्नोग्राफीचे उत्पादन, प्रकाशन व वितरण बेकायदेशीर आहे.

०२) माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० –

सध्या हा कायदा महत्वपूर्ण ठरतो. सदर कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत “पॉर्न” विषयी तरतूद करण्यात आली आहे. तसेच कलम ६७(अ) अंतर्गत त्यासंबंधी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. लहान मुलांवरील वाढते लैंगिक अत्याचाराचे गुन्हे बघता कलम ६७(ब) अंतर्गत चाईल्ड पोर्नोग्राफीला बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.

०३) महिलांचे निर्विकार प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा (Indecent Representation of Women [Prohibition] Act), १९८६ –

जाहिरातींद्वारे किंवा प्रकाशन, लेखन, पेंटिंग्ज, आकडेवारी किंवा इतर कोणत्याही प्रकारे आणि त्याद्वारे संबंधित गोष्टींसाठी महिलांचे अश्लील प्रतिनिधित्त्व प्रतिबंधित करणारा हा कायदा आहे.

# भारतात पॉर्न बघणं बेकायदेशीर आहे का?

कायद्यांचा खोलवर अभ्यास केला असता, पॉर्न बघणं बेकायदेशीर नसल्याचे समजते. याचा पुरावा म्हणजे, २०१५ साली शासनाद्वारा, “चार भिंतीत पॉर्न बघितले जात असल्यास हस्तक्षेप केला जाणार नाही.” असं विधान करण्यात आलं होतं. ह्या सर्व गोष्टींचा खोलवर विचार करता “पॉर्न” बघणं हा गुन्हा नसल्याचं निदर्शनास येते.

पण, जर एखादी व्यक्ती पॉर्न क्लिप दुसऱ्या व्यक्तीला बळजबरीने दाखवत असेल तर, तो मात्र कायदेशीर गुन्हाच ठरतो!

सोबतच, चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडिओ ब्राऊज करणे हा ही एक गुन्हाच!

# “पॉर्न” बघण्याबाबत समज, गैरसमज!

“पॉर्न” किंवा तत्सम व्हिडिओ बघणाऱ्याला लोकं चुकीच्या नजरेने बघतात किंवा ते नैतिकदृष्ट्या चुकीचे मानले जाते. एखादा जर पॉर्न बघत असेल तर, त्याला त्याचे शारीरिक तसेच मानसिक परिणाम समजावून न सांगता अपराधिक नजरेने बघितले जाते.

पॉर्न बघणे वा न बघणे हा जरी ज्याचा त्याचा विषय असला तरी, त्यामुळे आपण इतरांना त्रास तर देत नाही ना? किंवा आपल्या हातून मोठा गुन्हा घडण्याची संभाव्यता तर नाही ना? हे लक्षात घेतले पाहिजे.

# पॉर्न बघून खरंच गुन्हे घडतात का?

होय! तसे पुरावे आहेत.

०१) जून, २०१८ मध्ये पॉर्न व्हिडिओ बघून एका १३ वर्षाच्या मुलाने ३ वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. मुलीने त्या बळजबरीस विरोध केला तेव्हा, तिची गळा घोटून त्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील नोएडा येथे घडली होती.

०२) सप्टेंबर, २०२० च्या एका घटनेत, पॉर्न फिल्म बघून लैगिंक छळ करणाऱ्या पतीची, पत्नीनेच हत्या केल्याचं उघडकीस आलं होतं.

अशा अजुन किती तरी घटना घडल्या आहेत.

# पॉर्न बघितल्यामुळे काय होतात दुष्परिणाम?

जरी पॉर्न बघणं गुन्हा नसला तरी, तो सवयीचा भाग झाल्यास काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण बघणार आहोत.

०१) पॉर्न बघितल्यामुळे मेंदूत डोपामाइन द्रव्य मोठ्या प्रमाणात स्त्रवते. ज्यामुळे माणूस एक सुखकर संवेदना अनुभवतो. कोणतीही आवडणारी गोष्ट घडणे हे या द्रव्याला स्त्रवण्यास कारणीभूत ठरते. परिणामी, ती गोष्ट आपल्याकडून परत परत घडते. पॉर्न बघून हे द्रव्य स्त्रवते आणि परत पॉर्न बघण्याची इच्छा जागृत होते. कालांतराने ती इच्छा आपल्या सवयीचा भाग बनते.

०२) पॉर्न बघण्याची सवय एकदा लागली की, वेळेचं भान उरत नाही आणि त्यामुळे झोपेच्या वेळा कमी होतात. परिणामी, निद्रानाश ही समस्या उद्भवते.

०३) सततच्या सवयीमुळे माणूस एकलकोंडा होतो आणि त्याला कोणी नको असतं, परिणामी त्याची चिडचीड वाढते.

०४) सतत पॉर्न बघून समाधान मिळवणारे आपल्या जोडीदाराचा विचार करत नाहीत. ते फक्त आणि फक्त आपल्याच आनंदाचा विचार करतात ज्यातून कधी तरी विकृती जन्म घेते.

०५) सततच्या सवयीमुळे भावनिक जिव्हाळा कमी होतो आणि हे जोडीदारांमधील प्रेम कमी होण्यास कारणीभूत ठरते.

# तुमचे मत काय?

आम्ही मांडलेल्या या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये नोंदवा आणि अशाच नव नवीन लेखासाठी तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टलला नक्की भेट द्या.


लेखिका

खुशाली ढोके

लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.

अनेकवचन: 8 thoughts on “Is Watching Porn illegal in India? | पॉर्न बघितले तर होणार अटक?”

  1. शनी देशमुख

    आपण खुप छान लेख लिहीत आहात आणि आजच्या पिढीला जागृत करण्याचे अनमोल असे काम करत आहात ,असेच लेख लिहीत रहा आपल्या मराठी माणसाला जागे करत रहा.

    धन्यवाद!

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!