Home » SSC HSC result trolling | बारावीच्या निकालावरून ट्रोलिंग करणाऱ्यांनो, हिपोक्रसी की भी सीमा होती है!

SSC HSC result trolling | बारावीच्या निकालावरून ट्रोलिंग करणाऱ्यांनो, हिपोक्रसी की भी सीमा होती है!

Reading Time: 3 minutes

काल (३/८/२०२१) बारावीचे (HSC Result 2021) निकाल जाहीर झाले ()आणि पुन्हा एकदा बऱ्याच जणांचं ट्रोलिंग सुरू झालं.  (HSC, SSC Result 2021, maharashtra ssc result, cbsc result 2021)

बिना परीक्षा देता पास झाले, 

एवढे कसे टक्के पडले. 

आम्हीही याच बॅचला असायला हवं होतं वगैरे वगैरे.

अशा सर्वांपुढे नम्रपणे काही मुद्दे मला मांडावे वाटतात.

Must Watch Video

या दहावी बारावीच्या मुलांना अचानक ओढवलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे सवय नसताना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलंय.

काहींचे आई वडील, नातेवाईक भयंकर आजारपणातून गेलेत.

काही मुलं स्वतः आजारी पडले.

 एका मोबाईलवर दोघा तिघांनी अभ्यास केला.

शाळेचे happy moments त्यांनी गमावले.

काहींना अजिबात शाळेत जाता आलं नाही.

या आणि अशा अनेक कारणांमुळे ही मुलं विशेष आहेत. 

त्यांच्या जागेवर जाऊन बसणं आणि विचार करणं थोडं अवघड आहे. 

त्यामूळे trolling न करता, त्यांचं मनोबल वाढवायला हवं. आयुष्य प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या पध्दतीने पुढे जाण्याचा पर्याय उपलब्ध करून देतं.

Hypocrisy की भी सीमा होती है का म्हणालो माहितीये?

आपणच दरवेळी बोंबलत असतो, की रिझल्टमुळे कोणाची किंमत ठरत नाही, 

 विद्यार्थ्यांनी मार्क कमी आहेत म्हणून वाईट वाटून घेऊ नये.

आत्महत्या वगैरे करू नये. 

मग आता जर खरंच मार्क matter करत नसतील, तर बेस्ट झालं म्हणून आनंद साजरा करायला हवा.

ही मुलं वेगवेगळ्या transformation मधून जात आहेत. आधीच खेळायच्या वयात मोबाईल घेऊन बसण्यात त्यांचं आयुष्य चाललंय. त्यात आपण अजून त्यांना पुस्तकांना खिळवून ठेवण्याचा विचार करतोय.

तंत्रज्ञान पूर्णतः विकसित नसताना आपण पूर्ण शिक्षण व्यवस्था ऑनलाईन केली. याचा जरा व्यवस्थित विचार करा.

यात ना विद्यार्थ्यांचा दोष ना शिक्षकांचा.

म्हणून जे आहे चांगलं आहे म्हणून सर्वांनी मुलांच्या आनंदात सहभागी व्हायला हवं. उगाच फालतू स्टेटस ठेवत कॉमेडी करण्याचा प्रयत्न करू नये.

जी मुलं या वर्षी दहावी बारावी पास झाली आहे. त्यांच्यासाठी देखील मला काही मुद्दे सांगावे वाटतात:

१. जे आणि जसेही मार्क आले असतील त्यामुळे त्रास करून घेऊ नका किंवा जास्त हुरळून जाऊ नका. खरं चॅलेंज पुढे आहे हे लक्षात घ्या.

आपल्या खऱ्या क्षमता या वाईट काळात कळून येतात. स्वतःच्या क्षमतांचा जास्तीत जास्त शोध घेण्याचा प्रयत्न करा. हा निकाल म्हणजे शेवट नाहीये, यानंतर अजून खूप काही पुढे आहे. अजून खूप अनुभव तुम्हाला घ्यायचे अहेत.

२. पुढे करिअर बद्दल कोण- कोणत्या संधी  उपलब्ध आहेत, याचा चांगला अभ्यास करा.

आता तुमच्या समोर खजाना सादर होईल. गडबडून जाऊ नका. सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करा. करिअरकडे सिरीयसली पहा. आपले आयुष्याचे ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न करा. वहीत आपली ध्येय लिहून काढा. त्यानुसार शिक्षण कशात घ्यायचं ते ठरवा.

३. अनुभवी माणसांचे सल्ले घ्या आणि आपल्या आवडी- निवडी नुसार पुढे पाऊल टाका.

आपण इतरांच्या अनुभवातून खूप काही शिकू शकतो. सगळे अनुभव स्वतः घेणं शक्य नसतं. त्यासाठी आयुष्य अपूर पडेल, म्हणून अनुभवी माणसांचे सल्ले घ्या.

आमचा याच विषयावर छान लेख आहे तोही वाचा. 👇

दहावी नंतर पुढे काय? | SSC Board Exam & then what?

४. कोणाच्याही वाईट शब्दाचं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही काय भोगलं ते तुम्हाला माहित आहे. 

कोणी काही बोलल्याने आपल्याला छिद्र पडत नाहीत. कोणाचंही वाईट बोलणं मनावर घेऊन नका. बोलणारे बोलतील त्यांना बोलू द्यायचं.

५. जे तुम्हाला बोलताहेत त्यांनी खूप मोठे पराक्रम केलाय असं नाही. त्यामुळे जास्त कोणाच्या बोलण्याचा विचार करू नका.

तुमचे आई वडील असो वा काका मामा सगळे लहानपणी तुमच्या सारखेच होते. त्यांनीही मस्ती मजा केलेली आहे. त्यामुळे जास्त लोड घेऊ नका. 

६. आपल्या मित्र मंडळीना विसरू नका. त्यांच्याशी बाँड स्ट्राँग ठेवा.

मैत्री खूप काही शिकवते. आयुष्यभर शाळेतले मित्र मैत्रिणी लक्षात राहतात आणि खूप कमी लोकांना मैत्री टिकवता येते आयुष्यभर. तुम्ही टिकवा.

७. आता आयुष्याकडे जरा वेगळ्या दृष्टीने पहायला सुरुवात करा. 

तुम्ही सर्वात प्रगत पिढी आहात आजवरची आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा विचार करा.

८. प्रत्येक क्षण आनंदाने घालवा. जे आवडतं ते करा. हेच दिवस आहेत आनंद घेण्याचे. 

प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. पुढे श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. अनुभव सांगतोय. जगून घ्या!

९. पुस्तकं वाचा. कॉम्प्युटर येत नसेल तर तेही शिकून घ्या. ऑनलाईन कोर्स करा. 

जेवढं काही शिकाल तेवढे लवकर पुढे जाल. ती म्हण माहित असेल,

जो शांतीच्या काळात घाम गाळतो, त्याला युद्धात कमी रक्त सांडावं लागतं.

१०. पुढील पात्रता परीक्षा जर द्यायची असेल तर तयारी सुरू करा.

लगेच पुढच्या ज्या काही परीक्षा आहेत, त्यांच्या तयारीला लागा. कोणालाही तुम्हाला “ढ” ठरवण्याचा चांस देऊ नका.

सिद्ध करून दाखवा त्यांना सर्वांना, की ते मूर्ख आहेत!

हे सर्व तुम्ही जर करत असाल, तर तुमचं कोणीच अगदी हा कोरोना देखील काहीच बिघडवू शकणार नाही.

चिल्ल रहा. Enjoy करा!

Conclusion:

ट्रोल  करताना हजारदा विचार करायला हवा प्रत्येकाने. 

दहावी बारावीची पास झालेली ही मुलं खरंच खूप भयंकर प्रकार सहन करून इथवर आली आहेत. त्याचा विचार करायला हवा.

आयुष्य प्रत्येकाला योग्य ती संधी देतं स्वतःला सिद्ध करण्याची.
लेखक

शैलेश भोकरे

लेखक प्रेरणादायी वक्ते, Youtuber, तरुणाई डॉट कॉमचे संस्थापक, मुख्य संपादक आहेत.

ईमेल: shaileshbhokare8@gmail.com

अनेकवचन: 5 thoughts on “SSC HSC result trolling | बारावीच्या निकालावरून ट्रोलिंग करणाऱ्यांनो, हिपोक्रसी की भी सीमा होती है!”

    1. शिक्षण एक मार्ग आहे आपल्या स्वतः मध्ये बदल घडवून आणण्यासाठी , मुलांनी शिक्षण कसे घेतले किंवा शिक्षकांनी त्यांना कसे दिले हे महत्त्वाचे नाही . आहे त्या परिस्थितीत त्यांनी काय घेतले ते महत्त्वाचे आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना दोष देऊन काहीच फायदा नाही फक्त स्वतःच्या प्रसिध्दी साठी केलेली धडपड .

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!