Home » Most important 6 things required for a guaranteed job | नोकरी मिळेल! पण, तुमच्यात हवेत हे ‘सहा गुण’!
job, characteristics for a job

Most important 6 things required for a guaranteed job | नोकरी मिळेल! पण, तुमच्यात हवेत हे ‘सहा गुण’!

Reading Time: 3 minutes

नोकरी दो या, छोकरी दो!” अशा घोषणा आपल्या प्रत्येकाच्या ऐकण्यात आल्याच असतील. अर्थात प्रत्यक्ष नाही! पण, social media वर असे व्हिडीओ पाहण्यात येतात. ते पाहून आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. पण, आज ती सत्यपरिस्थिती आहे!

Un-employment हा विषय काढून Government वर निशाना साधला जातो. पण, संसदेतल्या चर्चेला विषय मिळतो, एवढंच काय ते घडतं!

तुमच्यासाठी मी आज या किचकट प्रश्नावर उत्तर घेऊन आलोय. कुठलीही नोकरी देणारी कंपनी त्यांच्या employees मध्ये काही गोष्टी शोधत असते, त्या कोणत्या? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लग्न जुळवताना अपेक्षा विचारल्या जातात, त्याच प्रमाणे नोकरी देतानाही कंपनीच्या काही अपेक्षा असतात.

जर, तुम्ही या सहा गोष्टींचा अंगिकार केला, तर तुमची नोकरी फिक्स झालीच म्हणून समजा!

काय आहेत त्या, चला बघूया!

०१) तांत्रिक विषयांचे ज्ञान (Technical Knowledge)

कुठल्याही उत्पादन संस्था अथवा सेवा संस्थांच्या कुठल्याही वस्तू किंवा सेवा बाजारात कार्यरत असतात. त्या कंपनीची कामे योग्य रित्या चालावीत तसेच त्यामध्ये सुधारणा करून अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक कंपनी स्वतःच्या मनुष्यबळावर जास्त लक्ष केंद्रित करत असते. 

तुम्हाला अशा संस्थेमधे मग ती खासगी, सरकारी किंवा निमसरकारी असो, त्या कंपनी बद्दल तसेच कामा संबंधी सर्व माहिती असणे गरजेचे आहे. म्हणेज, तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात शिकत आहात, त्याची सर्व तांत्रिक माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुमच्या या गुणाची तपासणी तुमच्या On-campus किंवा off- campus placement च्या Technical interview मधे होत असते. कॅम्पस प्लेसमेंट बद्दल अधिक जाणून घ्यायचं असल्यास 👉 येथे क्लिक करा.

०२.संवाद कौशल्य (Communication Skills)

“बोलणाऱ्याची माती पण विकते आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकत नाही.”

ही म्हण सर्वांना परिचित आहे.
सर्वात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की, संवाद कौशल्य म्हणजे, फक्त बोलणं नव्हे! तर, समोरच्याचं नीट ऐकून घेणं हे ही तितकंच महत्वाचं आहे. तुमच्यात असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गुणांचा (Talents)  वापर करून कंपनीचा कशाप्रकारे फायदा करून देऊ शकता, हे पटवून देण्यासाठी संवाद कौशल्य फार महत्त्वाचं आहे. 
यासाठी Niloofer giri  यांचा हा TEDx Video तुम्ही बघितलाच पाहिजे.

The Art of Communication | Niloofer Giri | TEDxPrabhadevi

०३.आत्मविश्वास (Confidence)

हातात घेतलेल्या कामाला पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी व्यक्तीचा आत्मविश्वास फार महत्वाची भुमिका बजावतो. अर्थात आत्मविश्वास सहज निर्माण होत नसतो. त्यासाठी चांगले वाईट अनुभव यावे लागतात. त्यात तुमची असणारी भुमिका तुमचा आत्मविश्वास वाढण्यास किंवा कमी करण्यास कारणीभूत ठरते.

जेव्हा मला हे समजून घ्यायचं होतं, तेव्हा संदीप माहेश्वरी सरांचा एक सोळा मिनिटांचा विडियो माझ्या बघण्यात आला होता आणि खरोखरच त्याची फार मदत झाली. तुमच्यासाठी मी लिंक शेअर करत आहे. आवर्जून बघा.

How to Build Self Confidence? By Sandeep Maheshwari I Hindi

४. कामाप्रती समर्पण (Dedication)

भारताच्या क्रिकेट संघाचा सद्ध्याचा कर्णधार विराट कोहली याची रणजी ट्रॉफीसाठी कर्नाटक विरूद्ध मॅच होती आणि त्याच दिवशी त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी आली! स्वतःला सावरून त्याने क्रिकेट मॅच संपवली आणि नंतर तो अंत्यसंस्कारासाठी गेला. हे एक जिवंत उदाहरण आहे Dedication चे.

कामामधे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट नुसार घर सोडून रहावं लागतं. जर टाईम लिमिट असेल तर, पाच-पाच, सहा-सहा महिने घरी जाता येत नाही. तर, अशाप्रकारे कंपनीच्या कामासाठी तुम्ही किती dedicated आहात याचा शोध कंपनी घेत असते.

मी या ठिकणी माझा स्वतःचा अनुभव सांगू इच्छितो,  माझ्या training पिरेड मध्ये मी दहा महिने घरापासून लांब तमिळनाडू येथे होतो. त्याचा फायदा म्हणून, जाॅब कन्फर्मेशन आणि seniors कडून appreciation ही मिळाले.

०५. अनुकूल स्वभाव (Friendly Nature)

चिल्लर गोष्टींवरून वाद घालणे. परस्पर तिरस्कारातून एखाद्याच्या कामात अडचणी निर्माण करणे. परिणामतः ते कंपनीच्या ग्रोथला अफेक्ट होतं. असा स्वभाव नसावा. मिळून मिसळून राहणे, एकमेकांची मदत घेऊन काम करणे हे ही कौशल्य तुमच्यात असणं तुम्हाला मोठ्या कंपनीमधे प्लेसमेंट साठी eligible बनवतं.

अर्थात, Team work तुम्ही किती समजता आणि त्याचा अवलंब कसा करता हे कंपनीला जाणून घ्यायचं असतं.
याचा जसा कंपनीला फायदा होतो तसा तुम्हालाही होतोच. तो असा की, यामुळे तुमचे त्या फिल्डमध्ये एक फ्रेंड सर्कल बनते आणि व्यक्तिगत विकासाच्या सिमा रूंदावतात.

०६.  इमानदारी (Honesty)

“Honesty is the best policy. If I lose mine honor , I lose myself.”

– William Shakespeare

तुम्ही करत असलेल्या कामानुसार तुम्हाला पगार मिळत असतो. अर्थात तो पुरेसा असेलच असे नाही! पण, इतर अवैधमार्गाने ते जमवणे एकदम चुकीचे आहे. तुम्ही सरकारी नोकरी करा अथवा खासगी, अवैध रित्या पैसे कमवण्याच्या संधी मिळत असतात. पण, तशा संधीचं सोनं करण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या आयुष्याची माती करत असता.

तसेच दिलेल्या कामाच्या completion साठी हवी ती मेहनत करायची तयारी तुमच्यात असली पाहिजे. योग्य आणि खरं कारण असेल तर नक्की सांगून त्यावर मार्ग शोधायला हवा. पण, उगाच विनाकारण विना अर्थाची कारणं देणं ही चुकीचे आहे.


अशाप्रकारे या गुणांचा अवलंब, तुम्हाला कार्पोरेट आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी मदत करत असतो. Interviews मध्ये याच सर्व गुणांची तपासणी केली जाते. तर मग “तयारीने जा आणि यशस्वी व्हा!

मी आशा करतो, की वरील मुद्दे तुम्हाला योग्य रित्या पटवून दिले असावेत आणि ते पटले असावेत.

लेख कसा वाटला? कमेंट्स मध्ये जरूर सांगा. सुधारणा असतील तर, त्या निःसंकोचपणे कळवा.आणखी कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला वाचायला आवडेल तेही कळवा.

योग्य माहिती सोप्या शब्दांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच असेल. सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद!

असेच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.


लेखक

बालाजी गुंडाप्पा साखरे

लेखक इंजिनिअर आहेत. सध्या L&T Construction Ltd. या कंपनी मधे कार्यरत आहेत.

Email : Balajisakhareg@gmail.com, Insta : balaji_sakhare_g

अनेकवचन: 37 thoughts on “Most important 6 things required for a guaranteed job | नोकरी मिळेल! पण, तुमच्यात हवेत हे ‘सहा गुण’!”

 1. बालाजी खूप सुंदर लेखन केलंस.बालाजी तुझ्या लेखनातूनच समजतं की तुही किती समजदार आहेस.तुझे अशेचा विचार तू सर्वा पर्यंत पोहचवत जा.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

 2. शनी देशमुख

  मित्रा,
  खुप छान रित्या लेखन केलं आहेस,याची आजच्या घडीला खुप नितांत गरज आहे मावळ्यांना कंपनी मदे पदावर रुजू होण्यासाठी ,तुझे अनमोल असे शब्द मराठी माणूस नक्कीच खरे ठरवेल आणि त्याच रुद्व्याने तो सिलेक्ट होईल, अशीच लेखणे लिहीत रहा आणि आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी जेकाही देता येईल ते आपण दिले पाहिजे!

  धन्यवाद मित्रा!

 3. स्वतःच्या अनुभवातून खुप छान आणि महत्वपूर्ण माहिती व्यक्त करतोयस याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल…👌👌👌
  तुझ्या लेखनास खूप खूप शुभेच्छा..

 4. खूपच छान लेख आहे. यातून खूप जणांना योग्य तो मार्ग मिळू शकेल. आजच्या भरकटलेल्या सोशल मीडिया च्या युगात शिकण्यासारखे खूप कमी दिसते पण अशा लेखणीतून खरच तरुणाईला योग्य ते मार्गदर्शन मिळेल..

 5. बालाजी अतिशय प्रभावी शब्दांमधे तु तुझे विचार व्यक्त्य केलेस . हा लेख सर्वाना नक्किच उपयोगी पडेल. Keep it up bro…

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!