Home » Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖
man in black long sleeved shirt and woman in black dress

Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖

Reading Time: 4 minutes

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

माझ्या या आधीच्या “मासिक पाळी आणि समज — गैरसमज” या ब्लॉगला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद..🤗🙏🏻

आज मी एका अशा विषयावर लिहिणार आहे,  जो सर्वांना माहीत आहे! अर्थात तो विषय आहे,  “प्रेम“.

या विषयावर तुम्हांला बरेच जण बोलले असतीलही!  पण, माझ्या या ब्लॉग मधून काहीतरी वेगळं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

प्रेम म्हणजे काय?, खरं प्रेम आणि खोट प्रेम यापलीकडे जाऊन आज मी बोलणार आहे.

समाजात प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? यावरही मी बोलणार आहे. 

माझे काही शब्द तुम्हाला बोचट वाटतीलही! पण, त्यातून मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहचेल ही छोटीशी अपेक्षा ठेवतो.

०१) प्रेम की लफडं
०२) Dating Apps
०३) विश्वास आणि Insecurity
०४) प्रेम आणि करिअर
०५) पहला पहला प्यार

या आणि अशाच मुद्द्यांवर आज मी बोलणार आहे.

चला तर मग सुरुवात करूया…

love, affection, tarunaee, youngsters

०१)  प्रेम की लफडं…

आज आपल्याला कित्येक जण जोडपी (Couple) म्हणून वावरतांना दिसतात. या गटामध्ये अगदी शाळकरी मुल – मुली इथपासून ते विवाहित स्त्री-पुरुष यांचा देखील समावेश आहे.

अविवाहित लोकांचं असतं ते “प्रेम प्रकरण” आणि विवाहित लोकांचं असतं ते “लफडं” असा समज आपल्याकडे बघायला मिळतो.

पूर्वीच्या काळी प्रेम प्रकरणं जास्त दिसायची नाहीत. पण, आजकाल प्रेम प्रकरणं नसलेला मुलगा किंवा मुलगी दुर्मिळच!

मुळात "प्रेम" ही भावना अगदी पवित्र आणि निर्मळ आहे. आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती, आपल्याला हक्काने वागवणारी व्यक्ती, आधार देणारी व्यक्ती, जिच्याशिवाय आपल्याला राहवत नाही अशी व्यक्ती असं सामान्यतः प्रेमाचं स्वरूप असतं.

पण, आजकाल प्रत्येकाने आपापल्या परीने प्रेमाची व्याख्या केलेली बघायला मिळते. कित्येक जण तर आकर्षणालाच प्रेम समजून बसतात. प्रेम आणि वासना यातला फरक देखील त्यांना कळत नाही आणि काही काळानंतर वेगळे होऊन लोकं प्रेमाला नाव ठेवतात किंवा मग त्या व्यक्तीला तरी!

मुळात एखाद्यासोबत नातं जोडण्याआधी आपल्या सवयी – आवडी जुळतात का?, हे बघणं आवश्यक असतं. नाहीतर, नंतर निव्वळ मनाची घालमेल होऊन, मन मारून नातं जपावं लागतं.

प्रेम ही भावना पूर्वी लोक समजून घ्यायचे.

पण, आजकाल कित्येक जोडप्यांनी केलेल्या पराक्रमामुळे लोकांचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. प्रेमाच्या नावाखाली शरीराची भूक भागवण्याचे आणि अश्लील चाळे करण्याचे प्रकार आजकाल सर्रास दिसतात. प्रत्येक जोडपं असं करत नसलं, तरीही काही जोडपी असं करतात याबाबत तिळमात्र शंका नाही.

०२) Dating Apps

कित्येक सोशल नेटवर्किंग साईट्स आणि डेटिंग अँप्स वरून लोक प्रियकर किंवा प्रेयसी शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून बऱ्याच जणांना जोडीदार मिळतो सुद्धा! पण, त्यातील खूप कमी नाती टिकतात. बाकी नाती विश्वासा अभावी तुटतात. कुठलंही नातं विश्वासावर टिकतं हे आजच्या पिढीतील खूप कमी जणांना कळतं.

बऱ्याचदा या dating apps द्वारे फसवणूक होऊन शारीरिक आणि आर्थिक शोषणही केले जाते. या apps द्वारे बऱ्याचदा हनी ट्रॅप चा धोका सुद्धा असतो. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या वरिष्ठ पदावर असाल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही विचित्र नको असेल तर, या नादात न पडलेलेच बरे!  काही apps विश्वासार्ह असतात ही. पण, शेवटी सगळं काही आपल्याच जबाबदारी वर अवलंबून असतं.

०३) विश्वास आणि Insecurity..

Relationship मध्ये आल्यावर कित्येक जण त्यांच्या जोडीदाराच्या सोशल नेटवर्किंग साईट चे पासवर्ड स्वतःजवळ ठेवतात आणि कित्येक जण तर अक्षरशः नजरकैद केल्याप्रमाणे ठेवतात. या गोष्टीस मुले आणि मुली दोन्ही अपवाद नाहीत. मुळात प्रेमात स्वातंत्र्य आणि विश्वास हवा तरच प्रेमाचं नात टिकतं.

कित्येक जण तर आपला पार्टनर साधा कोणासोबत बोलला तरीही Over Possessive होतात.  त्यामध्ये मग बऱ्याचदा मारहाण, शिवीगाळ असे प्रकार घडून येतात. 

ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता असं तुमचं मत असतं, तिला तुम्ही शिवीगाळ आणि मारहाण करून तुमच्या प्रेमाची धिंड काढलेली असते. ह्या गोष्टी आजकाल सर्रास बघायला मिळतात.

०४) प्रेम आणि करियर…

मला वाटतं की, प्रेम या विषयातील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रेमामुळे आपल्या करिअरकडे आपलं दुर्लक्ष होत आहे, असं आपण बऱ्याचदा ऐकतो किंबहुना म्हणतो सुद्धा. प्रश्न असा निर्माण होतो की, जी यशस्वी माणसे आहेत ती सर्व निर्व्यसनी आहेत का? तर नक्कीच नाही. कारण, प्रेम हे सुद्धा एक व्यसनच आहे.

तुमचा जोडीदार जर अपेक्षा पूर्ण करून घेण्यापालिकडे तुमच्या भविष्याची खरंच चिंता करत असेल! तर, तुम्हांला आणखी कशाचीच आवश्यकता नाही. 

प्रेमात माणूस नको ते करू शकतो मग त्यापासून साधी प्रेरणा तर घेऊच शकतो! नाही का?

अनेक जोडपी एकत्र यशस्वी झाल्याची देखील कित्येक उदाहरणे आहेत. पण, तसा सकारात्मक दृष्टिकोन हवा. कित्येक मुली अशा आहेत. ज्या आपल्या पार्टनरला भविष्याची जाणीव करून देतात आणि त्याला Support सुद्धा करतात. ही उदाहरणे तुम्हांला दिसतील. पण, त्यासाठी तुमची ती उदाहरणे बघायची इच्छा आणि मानसिकता असायला हवी. 

मित्रांनो, प्रेमळ संभाषण आवश्यक आहेच. पण, त्याचबरोबर जर भविष्याचा विचार करत दोघांनीही पाऊले उचलली, तरंच प्रेम खऱ्या अर्थाने सफल होतं. नाहीतर, ते टाईमपास बनून राहतं.

त्यामुळे दोघेही समजूतदार आणि समंजस असले तरंच ते नातं टिकतं. उगाच कोणीतरी आपल्या स्वप्नातलाच येईल असं बघू नका, आयुष्यात ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हा त्या घडतातच. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ती आधीच ठरलेली असते.

त्यामुळे प्रेम होण्याची वाट न बघता तेच प्रेम इतर स्वरूपात इतरांना देऊन बघा, तो आनंद सुद्धा तुम्हांला नक्कीच स्वर्गसुख देऊन जाईल.

love, affection, tarunaee

०५) पहला पहला प्यार…!

फिल्म मध्ये दाखवून तरुणाई च्या मनात घातलेलं सर्वात थिल्लर वाक्य म्हणजे, “प्यार एक ही बार होता है!” मुळात असं काही नसतं.

अगदीच निष्कर्ष काढायला गेलं तर, 90% जणांना पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीवर होतं. 

पुस्तकातील एक पान फाटलं म्हणून, काय पुस्तक फेकून द्यायचं का? त्याचप्रमाणे प्रेम हे केवळ आयुष्यातील एक पान आहे. 

प्रेम भंगामुळे जीव देणारे मूर्ख असतात असं म्हटलं तरी हरकत नाही.  कारण, आज जगात कित्येक जण अशा परिस्थितीत जगतात की, बघताना अंगावर काटा उभा राहील. 

आपली एवढी चांगली स्थिती आहे मग जीव का द्यायचा? हा विचार एकदा करायलाच हवा.

एखाद्याचं प्रेम नाही मिळालं म्हणून, ते हिसकावून घेणं ही सुद्धा एक विकृतीच आहे. तेव्हा जास्त लांबलचक न घेता एवढंच सांगेन की, आयुष्यात जोडीदार निवडताना सर्व गोष्टी पडताळून पहायला हव्यात. 

प्रेमाने पोट भरत नाही, पोट फुगतं.

त्यामुळे प्रेम निवडायचं कसं आणि त्याला जपायचं कसं हा सर्वस्वी आपल्या विवेकाचा प्रश्न आहे.


लेखक

शुभम वाढोनकर (B.A., M.A.)

ईमेल – srwcool0724@gmail.com Instagram Id:- shubhw_1999

मोबाईल नं :- 9834455641 

अनेकवचन: 4 thoughts on “Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖”

  1. अत्यंत प्रेरणादायी अशी माहिती दिलीय . . …
    खरच आजकाल प्रेम या शब्दाचा अर्थ च नेमका काय आहे ते कळत नाही …त्यामध्ये आपण खूप छान प्रकारे explain केलंय sir 👍

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!