Home » Lokmanya Bal Gangadhar Tilak | लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

Lokmanya Bal Gangadhar Tilak | लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

Reading Time: 2 minutes

पुण्यतिथी निमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाचा व विचारांचा आढावा!

lokmanya tilak, bal gangadhar tilak

शके १८४२ च्या आषाढ शु. १५ म्हणजेच, ०१ ऑगस्ट १९२० रोजी, भारतातील “राजकीय असंतोषाचे जनक” थोर राजकारणी मुत्सद्दी, वृत्तपत्रकार, वेदादि प्राचीन वाङ्मयाचे अभ्यासक लोकमान्य टिळक यांचे मुंबईत निधन झाले.

त्यापूर्वी चाळीस वर्षांत सूर्याने इतक्या येरझाऱ्या केल्या, वारा इतक्या वेळा वाहिला, समुद्राला इतक्या वेळा भरती आली, तारे इतक्या वेळा चमकले! पण, त्या प्रत्येक भ्रमणाने, पवनाने, लाटेनें, चमकण्याने हेच तत्व पुनः पुनः प्रस्थापित केले आहे की, टिळक म्हणजेच, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच टिळक!

ह्या चाळीस वर्षातील एक कृति काढा, एक गोष्ट घ्या, एक वर्तमानपत्र वाचा, एक राजकारण उलगडा! त्या शोधकांना काय आढळेल? इ. स. १८८० मध्ये टिळक महाराष्ट्राच्या राजकीय पटांगणांत उतरले आणि १९२० मध्ये ते महाराष्ट्रच नव्हे तर हे जग सोडून गेले. 

‘बाळ गंगाधर टिळक!” टिळकांच्या निधनानंतर संपुर्ण भारतखंडांत त्यांची स्मारके उभारण्यात आली. मुंबईला ज्या ठिकाणी त्यांच्या शवाला अग्नी देण्यात आली होती, त्या ठिकाणी सन १९३३ मध्ये टिळकांचा भव्य पुतळा लोकनायक बापूजी अणे यांच्या हस्ते उभारण्यात आला.

केसरीतील लिखाणामुळे २३ जुलै १९०८ रोजी टिळकांवर खटला भरण्यात आला. न्या. दावर यांच्या पुढे काम सुरू झाले. टिळक स्वतःच काम पाहणार होते. स्वतःच्या बचावाचे भाषण टिळकांनी साडेचार दिवसा पर्यंत केले. त्यातील विद्वत्तापूर्ण विवेचन पाहून कायदेपंडितांनी माना डोलवल्या. इंग्लंडमधील राज्यद्रोहाचा कायदा, तेथील खटले, ज्यूरीच्या अधिकाराचे क्षेत्र, मुद्रणस्वातंत्र्याचा इतिहास, त्यांच्या कायदा आदि विषयांवर मुद्देसूद विवेचन टिळकांनी केले. त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

शिक्षा सांगण्यापूर्वी आरोपीस विनंती केली गेली तेव्हा, लो. टिळक बोलले, “मला सांगावयाचे असे फार थोडेच आहे. ज्यूरीने मला दोषी ठरविले तर खुशाल ठरवो. पण, मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टिंचे नियंत्रण करणारी अशीही एक शक्ति न्यायपीठाहूनही वरिण आहे. कदाचित् ईश्वराची इच्छाच असेल की, मला शिक्षा व्हावी!

यावर न्याय मूर्तीनी शिक्षा सांगितली, “तुम्हाला शिक्षा सांगताना मला दुःख होत आहे. कमीत कमी शिक्षा म्हणून, सहा वर्षांची काळ्या पाण्याची सजा मी तुम्हास देतो.

त्या काळातील लोकांना गुलामगिरीत जगण्याची सवय झाली होती, आणि परकीय शत्रूचा अन्याय सहन केल्याशिवाय पर्याय उरला नव्हता, या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या देशात अनेक महान आत्म्यांचा जन्म झाला त्यापैकी एक म्हणजे, बाळ गंगाधर टिळक त्यांना लोकमान्य टिळक असेही म्हटले जाते.

असं म्हणतात,

“क्रांतीसाठी बंड पुकारण्याचे कार्य तेच करू शकतात ज्यांचे विचार खुले असतील! म्हणजेच, मुक्त विचारांचे लोकं.”

त्या महान व्यक्तींपैकी एक म्हणजे, बाळ गंगाधर टिळक!

तर, आजच्या लेखात बाळ गंगाधर टिळक यांचे काही जीवनविषयी प्रेरणादायी विचार आपण बघणार आहोत.

०१) “कार्यात यश मिळो वा न मिळो प्रयत्न करण्यात कधीही माघार घेता कामा नये.”

०२) “माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी, शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही.”

०३) “मानसाचा स्वभाव हा विना उत्सवाचा राहू शकत नाही! म्हणून, आपल्यासाठी उत्सव असणे गरजेचे आहे!”

०४) “तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर, त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल ; गोणपाटा सारखा कराल तर, त्यातून परमेश्वर कसा दिसेल!”

०५) “स्वर्गापेक्षा, चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन! कारण, पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होते.”

०६) “स्वातंत्र्य म्हणजे विष! स्वराज्य म्हणजे दुध.

मित्रांनो अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.


संकलन:

आदित्य असाबे

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!