Home » How you see Sex Education as… | “लैंगिक शिक्षण” म्हणजे काय?
sex education, biology,

How you see Sex Education as… | “लैंगिक शिक्षण” म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes

“लैंगिक शिक्षण” म्हणजे काय?

समाजात वावरताना आपण लैंगिक भाव – भावना कसे व्यक्त करतो किंवा आपली लैंगिक वर्तवणूक कशी असावी, त्याचे इतरांना कुठलेही नुकसान पोहचू नये त्यासाठी कोणती काळजी घेता येईल. अशा सर्व विचारपूर्वक बाबींचा समावेश “लैंगिक शिक्षण” या विषयात होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

गैरसमज!

“लैंगिक शिक्षण” यात लिंगाविषयी भाव येतात म्हणून, लोकांचा विशेषतः आपल्या भारतात बहुसंख्यांचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन निराळा! कधी त्याकडे किळसवाण्या भावाने बघितले गेले! तर, कधी जो बोलणारा असेल त्याला अपराधिक नजरेने! पण, “लैंगिक शिक्षण” ही सुद्धा एक नैतिक जबाबदारी म्हणून, त्याकडे बघितलेच जात नाही! परिणामी अमानवी कृत्य बढावल्याचे दिसून येते.

यामागची मानसिकता काय?

“बलात्कार” किंवा “सामूहिक बलात्कार” यासारख्या घटना घडणे काही प्रमाणात थांबले म्हणजे, आपण “लैंगिक शिक्षण” याचा अभ्यासक्रम पूर्ण केला, असं मुळीच नाही. तर, समाजात विचित्र कृत्य घडतंच असतात जे खरंच एका स्थिर बुध्दीला हेलावून टाकणारे असतात. जसे, एखाद्यावर अभद्र टिप्पणी करणे, एखाद्याच्या शरीरावर बोलणे इत्यादी.

सोशल मीडिया आणि लैंगिक शिक्षण!

मागे घडलेली एक घटना इथे सामायिक करावी वाटते. “बॉईज लॉकर रूम इन्सीडन्स” इंस्टाग्राम स्कँडल म्हणून उघडकीस आला होता. ज्यात मुलींच्या मॉर्फ केलेल्या फोटोज सामायिक करून, त्यावर अभद्र टिप्पण्या त्या गटातील सभासद(ग्रुप मेंबर्स) असणाऱ्या मंडळींकडून केल्या गेल्या होत्या. नंतर काही दिवसांनी असाच एक “गर्ल्स लॉकर रूम” ग्रुप असल्याचंही उघडकीस आलं मात्र त्यावर जास्त बोललं गेलं नाही.

एकूणच, या परिस्थितीचा आढावा घेतल्यास समजेल की, एखाद्याच्या शरीरावर टिप्पणी करणे किंबहुना ती खालच्या पातळीत जाऊन करणे! याचं भान “लैंगिक शिक्षण” या अभ्यासक्रमातून देण्याची सुरूवात घरातूनच केली गेली तर, असे कृत्य काही प्रमाणात आपण कमी करू शकतो.

मोडस ऑपरेंडी! (Modus Operandi)

वेळोवेळी अशा घटना समोर येत असतात आणि कालांतराने त्या गडप होतात. याविरुद्ध आक्रोश जर मजबूत आणि कणखर असला तर, एक – दोन दिवस त्यावर सोशल मीडियावर विरोध दर्शवला जाऊन, पुढे तो आक्रोश हरवतो. पण, फक्त आवाज उठवणे इतकेच पुरेसे आहे का? तर नक्किच नाही! आपल्याला ह्या कृत्यामागील मानसिकता समजून घ्यावी लागेल आणि त्या शिकवणी घरातूनच द्याव्या लागतील.

लैंगिक शिक्षण का गरजेचे?

माणूस हा एक प्राणी आहे. बरोबर! पण, तो जरी एक प्राणी असला तरी एक “सामजिक प्राणी” असल्याचं भान विसरून, कधी तरी अशा घटना घडण्यास कारणीभूत असतो. हे भान कधी अहंकार तर कधी एखाद्याविषयी असणारा मनातील द्वेष या दुर्भावनेने तो हरवून बसतो. एखाद्या मुलीने/मुलाने नकार दिल्यास त्यांना त्रास देण्याच्या हेतूने जे काही कृत्य घडते आणि त्यातून जे नुकसान होते! ते नंतर कुठलीही किंमत मोजून सुद्धा भरून निघू शकत नाही. म्हणून, “लैंगिक शिक्षण” इथे गरजेचे ठरते.

इथे हे सांगणे गरजेचे ठरते की, एखाद्याने आपल्याला नकार देणे हा त्यांचा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. ही शिकवण घरातूनच मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मुलांसोबतच्या संवादातील फटीमुळे या प्रश्नांचे निरसन होत नाही आणि मग दुसऱ्याच मार्गाने त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या नादात ते चुकीच्या माणसांकडून मदत घेऊन, स्वतःचे नुकसान करवून बसतात.

कोरोना आणि आव्हाने?

सध्या कोरोनाकाळात सगळं काही ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून सुरू असल्याने, “ऑनलाईन शिक्षण पद्धतीला” वाव मिळतो आहे. तंत्रज्ञान विकास झपाट्याने होतोय. हे कौतुकास्पद आहेच! मात्र, हे होताना आपली मुलं शिक्षणाव्यातिरिक्त अजुन कुठे गुंतत तर नाहीत ना! किंवा वाईट गोष्टी तर त्यांच्या हातून घडत नाहीत ना! यावर लक्ष ठेवणे खूप गरजेचे होऊन बसले आहे. कारण, एखादी गोष्ट न मिळणे आणि ती मिळवण्याची जिद्द असणे हा उत्साह त्यांना कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही.

आपण केवळ प्रतिबंध म्हणून, काही सेटिंग्ज ह्या मुलांच्या ऑनलाईन लेक्चर्स वेळी करून ठेऊ शकतो जेणेकरून, ते अभ्यासा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टी नेटवर सर्च करणार नाहीत. जर, मुलांना ऑनलाईन लेक्चर्स सुरू असताना वेब सर्चींग करावी लागत असेल तर, मोठ्यांनी त्यांच्या सोबत असावं जेणेकरून, त्यांच्याकडून काही चुकीचं घडणार नाही.

इट्स देअर चॉईस!

समाजात आपले वर्तन कसे असावे? यावरून आपण लैंगिकदृष्ट्या किती परिपक्व हे ठरतं. मग मुलींनी कोणते कपडे घालावे यावरून त्यांना इंस्ट्रक्शन्स दिल्या जात असतील तर, प्रत्येकानेच आपण लैंगिकदृष्ट्या किती परिपक्व आहोत? हा प्रश्न इथे आवर्जून विचारायला हवा!

लैंगिक शिक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य!

लैंगिकदृष्ट्या परिपक्व असण्यात अजुन एका गोष्टीचा समावेश होईल ते म्हणजे, समलैंगिक संबंध. एखाद्याने, कोणाला त्यांच्या शारीरिक सुख – दुःखात सामावून घ्यावे! किंवा एखाद्याने, कोणासोबत शारीरिक संबंध ठेवावेत हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असला पाहिजे. त्याचप्रमाणे १८ वर्षांवरील प्रत्येकाला त्यांचे वैयक्तिक निर्णय घेऊ देणे हे सुध्दा लैंगिकदृष्ट्या परिपक्व असण्यात मोडतं.

लक्षात घ्यावयाच्या गोष्टी!

“लैंगिक शिक्षणात” दुसऱ्यांच्या शरीरावर चुकीच्या टिप्पण्या करू नये वा त्यांच्यावर हसू नये याचा देखील समावेश होतो. मात्र आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्यावर खालच्या पातळीत जाऊन टीका – टिप्पण्या करण्याचा ट्रेण्ड जोरात सुरु आहे. ही वागणूक नैतिकदृष्ट्या चुकीची आहे. कारण,

“लैंगिक शिक्षण” हा केवळ अभ्यास म्हणून रटण्याचा विषय नाही. तर, ती आपली नैतिक जबाबदारी समजावी आणि हे करताना “लैंगिक शिक्षण” एक संस्कार म्हणून स्वीकारावे.

अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टलला नक्की भेट द्या.


लेखिका

खुशाली ढोके

लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.

khushi.dhoke111@gmail.com

अनेकवचन: 4 thoughts on “How you see Sex Education as… | “लैंगिक शिक्षण” म्हणजे काय?”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!