Home » History of India in Olympic games | भारताचा ऑलम्पिक स्पर्धेतील इतिहास
hands, protection, olympic rings-1429672.jpg

History of India in Olympic games | भारताचा ऑलम्पिक स्पर्धेतील इतिहास

Reading Time: 6 minutes

ऑलम्पिकचा इतिहास खूप जुना आहे (१८९६-२०२१).  हा खेळ १२०० वर्षापूर्वी जे सैनिक (शूरपुरुष) खेळाडू होते, त्यांच्यामध्ये खेळवला जायचा. सुरुवातीच्या काळात धावणे, मुष्टियुद्ध, कुस्ती इ. खेळ होते.

१८९६ मध्ये युनान(ग्रीस)ची राजधानी अथेन्स येथे सर्वप्रथम हि स्पर्धा आयोजित केली गेली. ओलम्पिया पर्वतावर खेळवला म्हणून या खेळाला पुढे “ऑलम्पिक” हे नाव पडले.

  

ऑलम्पिकचे प्रतिक म्हणून ५ रंगीत गोल एकमेकांना जोडलेले आहे. हे गोल म्हणजे ५ खंडाचे प्रतीनिधीत्व करतात.

निळे चक्र- युरोप खंड, पिवळे चक्र- आशिया खंड, काळे चक्र-आफ्रिका खंड, हिरवे चक्र ऑस्ट्रेलिया खंड, लाल चक्र- उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड. 

 हि स्पर्धा निपक्ष आणि मुक्त स्पर्धेचे प्रतिक आहे. 

ऑलम्पिक हा असा खेळ आहे, ज्यात २०० देशांमधून हजारो प्रकारचे खेळाडू विविध खेळात सहभाग घेतात व त्यांच्या देशाला मेडल मिळवून देतात. ज्यात सुवर्ण पदक (Gold Medal), रौप्य पदक (Silver Medal), कांस्य  पदक (Bronze Medal) यांचा समावेश होतो.

तसेच ऑलम्पिक हा खेळ दर ४ वर्षातून होत असतो आणि २०० देशामधून त्या-त्या देशांना ऑलम्पिक चे प्रतीनिधीत्तव करण्याची संधी देण्यात येते. ह्या ऑलम्पिकमध्ये सुद्धा प्रकार आहेत 

ऑलम्पिकमध्ये भारताचा इतिहास :-

ऑलम्पिकमध्ये भारताने सर्वात आधी १९०० मध्ये भाग घेतला होता. तेव्हा भाग घेणारा एक मात्र खेळाडू “नार्मन प्रीजर्द” हा होता. १९२० ते १९८० पर्यन्त  भारताचा हॉकि या खेळात दबदबा होता. या दरम्यान भारताने टोटल  ११ पदक जिंकले, त्यात ९ सुवर्ण पदकाचा समावेश आहे. २०१६ पर्यन्त भारताने २८ पदक पटकावले आहे. त्यात ९ सुवर्ण पदक आहेत, ७ रौप्य पदक आहेत, तर १२ कांस्य  पदक आहे आणि हॉकी मध्ये सर्वात जास्त सुवर्ण  पदक आहे.

भारताचा ऑलम्पिक पदकांचा  इतिहास:-

 1. के.डी.जाधव :- खाशाबा दादासाहेब जाधव

खेळ :- कुस्ती 

कांस्य पदक   : हेलसिंकी (१९५२)

    व्यक्तिगत स्पर्धेत ऑलम्पिक खेळात भारताला पदक मिळवून देणारे ते पहिले खेळाडू होते. त्यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी मध्ये कुस्ती या गटात भारताला कांस्य  पदक पटकावून भारताची मान उंचावली. या अगोदर भारताला संघीय हॉकी मध्ये पदक आले होते, पण व्यक्तिगत मध्ये पहिलेच पदक होते. 

त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांची उंची छोटी असल्यामुळे ते “पॉकेट डायनामो” या नावाने सुद्धा ओळखले जायचे आणि महत्वाचे म्हणजे ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहेत. जेव्हा ते पदक घेऊन आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी १०० बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती .त्यांच्या घरापासून जे अंतर फक्त १५ मिनिट होते. त्यांना तेच अंतर खाशाबाच्या स्वागतसाठी ७ तास लागले होते, असे हे महाराष्ट्रातील नववे तर देशातील पहिले व्यक्तिगत ऑलम्पिक पदक विजेते.

 1. लिएडर पेस :- 

खेळ     :- टेनिस 

कांस्य पदक :- अटलांटा(१९९६)

    भारतीय टेनिस खेळातील मधील अग्रगण्य नाव कुठले असेल, तर ते लिएडर पेस (Leander paes). १९५२ नंतर १९९६ मध्ये दुसरे व्यक्तिगत आणि टेनिस खेळातील पहिले पदक भारताला मिळाले. लिएडर पेस सरळ ७ ऑलम्पिक मध्ये भाग घेणारा विश्वातील एकमात्र टेनिस खेळाडू आहे. त्यांनी त्याच्या कारकिर्दीत १८ ग्रान्ड स्लेम पुरस्कार जिंकले. ज्यात ८ जोडीने तर १० मिक्स जोडीने पुरस्कार आहेत. त्यांचा जन्म कोलकाता मध्ये झाला. त्यांची आई जेनिफर पेस १९८० च्या बास्केटबॉल चँम्पिअन मध्ये भारताची कॅप्टन होती. तर असे आहेत दुसरे ऑलम्पिक पदक विजेते लिएंडर पेस 

 1. कर्णम मल्लेश्वरी :-

खेळ :-भारोतत्लन( Weightlifting)  

कांस्य पदक :- सिडनी(२०००)

    भारतात “आयरन लेडी”नावाने प्रसिद्ध अशी कर्णम मल्लेश्वरी.ऑलम्पिक मध्ये भारताला पदक जिंकून देणारी ती एकमेव  महिला खेळाडू आहे. त्यांनी ६९ किलो वर्गात कास्य पदक पटकावले होते. त्यांचा जन्म आंध्रप्रदेश मधील श्रीकाकुलम मध्ये झाला होता. वयाच्या१२व्या वर्षापासूनच भारत्तोलन(weightlifting)चा अभ्यास सुरु केला होता. त्यांनी २४० किलो वजन उचलले होते त्या दिवशी. त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कारने आणि त्या नंतर राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले. अश्या ह्या एकमेव पहिल्या महिला खेळाडू कर्णम मल्लेश्वरी .

 1. राज्यवर्धन सिह राठोड:-

खेळ :- डबल ट्रेप राफायल नेमबाजी  

रौप्य पदक:- अथेन्स(२००४)

    कर्नेल राज्यवर्धन सिह राठोड ऑलम्पिक मध्ये व्यक्तिगत स्पर्धे मध्ये रौप्य पदक जिंकणारे ते पहिले भारतीय एथलिट आहे. २००४ अथेन्स मध्ये पुरुष गटात डबल ट्रेप मध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्यांचा जन्म राजस्थान मधील जैसलमर मध्ये झाला होता. त्यांना २००५ मध्ये पद्मश्री, राजीव गांधी खेळ रत्न, आणि अर्जुन पुरस्कारने सुद्धा सन्मानित केले आहे. तर असे आहेत पहिले रौप्य पदक विजेते.

 1. अभिनव बिंद्रा:-

खेळ     :- १० मी. नेमबाजी 

सुवर्ण पदक :- बीजिंग ऑलम्पिक (२००८)

    देशाला ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळूवून देणारे अभिनव बिंद्रा हे पहिले भारतीय ठरले. त्यांनी २००८ मध्ये ऑलम्पिक मध्ये १० मी.एअर रायफल खेळात सुवर्ण पदक जिंकले. त्यांचा जन्म देहरादून मध्ये झालाआहे. त्यांनी वयाच्या १५ वर्षी राष्ट्मंडळ खेळा मध्ये सहभाग घेतला होता.त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 1. सुशील कुमार :-

खेळ     :- कुस्ती 

कांस्य पदक :- बीजिंग ऑलम्पिक(२००८)

रौप्य पदक :- लंडन ऑलम्पिक (२०१२)

    ऑलम्पिक मध्ये २ पदक जिंकणारे ते एकमेव खेळाडू आहेत.त्यांचा जन्म दिल्ली मध्ये बपरोला गावात झाला आहे. त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळ रत्न आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. खाशाबा जाधव नंतर कुस्तीत पदक आणणारे ते दुसरे भारतीय ठरले .

 1. विजेंदर सिह :

खेळ : मुष्टियुद्ध 

कास्य पदक : बीजिंग ऑलम्पिक (२००८)

    विजेंदर सिंह यांनी ऑलम्पिक मध्ये मुष्टियुद्ध खेळात २००८ साली कांस्य पदक जिंकून भारताच्या शिरपेचात अजून एक पदकाचा तुरा रोवला. त्यांना राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना  सन्मानित केले. त्यांना “रिंग ऑफ किंग” या नावाने सुद्धा संबोधले जाते. त्यांना जन्म हरियाना मध्ये भिवानी जिल्ह्यात झाला.आंतरराष्टीय मुष्टियुद्धात सुद्धा ते पहिल्या क्रमांकावर आहेत.

 1. गगन नारंग :-

खेळ     :- नेमबाजी 

कांस्य पदक :- लंडन ऑलम्पिक (२०१२)

२०१२ च्या लंडन ऑलम्पिक मध्ये १० मी. एअर रायफल   खेळात  त्यांनी भारताला कांस्य पदक जिंकून दिले. त्यांचा जन्म चेन्नई मध्ये झाला आहे. त्यांना भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कारने सन्मानित केले आहे .

 1. विजय कुमार :-

खेळ :- २५ मी रँपिड फायर पिस्टल 

रौप्य पदक :- लंडन ऑलम्पिक(२०१२)

    विजय कुमार यांनी २०१२ च्या ऑलम्पिक मध्ये (rapid fire pistol) या नेमबाजीच्या प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशच्या हमीरपुर जिल्ह्यात झाला. त्यांना भारत सरकारद्वारे अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार,आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 1. योगेश्वर दत्त :-

खेळ    :-कुस्ती 

कास्य पदक :- लंडन ऑलम्पिक (२०१२)

    ६० कि. वजनी गटात कुस्ती या प्रकारात त्यांनी भारतासाठी  कांस्य पदक पटकावले .त्यांचा जन्म हरियाना मध्ये सोनीपत जिल्ह्यात झाला आहे. त्यांना राजीव गांधी खेळ रत्न आणि पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

 1. सायना नेहवाल :-

खेळ :- बॅडमिंटन

कांस्य पदक :- लंडन ऑलम्पिक (२०१२)

    २०१२ च्या लंडन ऑलम्पिक मध्ये भारतासाठी खूप खास होते त्यांचे कारण असे कि त्या वेळेस भारताला ६ पदके मिळाली होती.त्यात सायना नेहवाल ने महिला एकेरी गटात भारताला कांस्य पदक जिंकून दिले. त्यांचा जन्म हिसार मध्ये झाला. त्यांना भारत सरकारने पद्मश्री,पद्मभूषण,अर्जुन पुरस्कारांनी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित केले.

 1. मेरी कोम :-

खेळ     :- मुक्केबाजी 

कांस्य पदक  :- लंडन ऑलम्पिक 

    लंडन ऑलम्पिक मध्ये महिला मुक्केबाजी मध्ये पदक जिंकणाऱ्या  त्या पहिल्या खेळाडू आहेत. २०१२ मध्ये ५१ कि. या गटात मध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले. मेरी कोम यांनी जागतिक मुक्केबाजी मध्ये सर्वाधिक ६ सुवर्ण आणि एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले. त्यांना “सुपरमॉम” या नावाने सुद्धा संबोधले जाते. त्यांचा जन्म मणिपूर राज्यात झाला. त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्कार,पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभूषण,आणि राजीव गांधी खेळ रत्न ने सन्मानित करण्यात आले.

 1. साक्षी मलिक :

खेळ : कुस्ती 

कांस्य पदक : रियो दि जनिरिओ (२०१६)

     साक्षी मलिक ने ५८ कि. वजनी गटात फ्रीस्टायल कुस्ती मध्ये भारताला कांस्य पदक जिंकून दिले.ऑलम्पिक मध्ये कुस्तीया गटात पदक जिंकणारी ती पहिला महिला होती.साक्षी मलिकचा जन्म हरियाणा मध्ये रोहतक या जिल्ह्यात झाला. त्त्यांच्या या कामगिरीसाठी भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने त्यांना  सन्मानित केले.

 1. पी.वी.सिंधू :

खेळ : बॅडमिंटन (badminton)

रौप्य पदक : रियो दि जेनिरिओ (२०१६)

कांस्य पदक : टोकियो (२०२०)

    व्यक्तिगत सलग २ पदक जिंकणारी भारताची स्टार खेळाडू हिने रियो दि जेनिरिओ (२०१६) मध्ये रौप्य तर टोकियो (२०२०) ऑलम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे .तिचा जन्म हैदराबाद मध्ये झाला. तिला भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार,अर्जुन पुरस्कार,आणि पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 1. मीराबाई चानू :

खेळ  : भारोत्तालन 

रौप्य पदक ; टोकियो (२०२०)

भारोत्तालन (weightlifting) मध्ये  ४९ वजनी गटात मीराबाई चानू हिने भारतासाठी  रौप्य पदक जिंकले. तिचा जन्म मणिपूर राज्यात झाला. भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले गेले.

 1. हॉकी भारत टीम :

     भारत ऑलम्पिक मध्ये आत्ता पर्यंत  सर्वात जास्त ११ पदक हॉकी मध्ये जिंकले. त्यात ९  सुवर्ण पदक, १ रौप्य तर १  कांस्य पदक आहेत. १९२८ पासून ते १९५६ पर्यंत  हॉकी मध्ये फक्त भारताचे वर्चस्व होते. एम्सटडेर्म(१९२८)मध्ये पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकून भारताच्या पदकतालिकेत मुहर्त केला. त्या नंतर लॉस एन्जेल्स(१९३२), बर्लिन(१९३६), लंडन(१९४८), हेलसंकी(१९५२), मेलबोर्न(१९५६), टोकियो(१९६४), मॉस्को(१९८०) मध्ये सुवर्ण जिंकले, तर रोम ऑलम्पिक(१९६०) मध्ये रौप्य पदक आणि  म्युनिख ऑलम्पिक मध्ये(१९७२ ) मध्ये कांस्य पदक जिंकले. ह्या खेळातला जादुगार मेजर ध्यानचंद होते. त्यांनी बर्लिन ऑलम्पिक मध्ये १३ गोल केले त्यांना “हॉकी चे जादुगार” सुद्धा म्हटले जाते.

अश्या रीतीने आम्ही भारताचा ऑलम्पिकचा इतिहास तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हला जर हा प्रयत्न आवडला, तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि हो पुढे शेअर करायला विसरू नका.


लेखक

विशाल नवनाथ वाघ

लेखक बी. ई. इलेक्ट्रोनिक्समध्ये शिक्षण घेत आहेत.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!