इंजिनियरिंग आणि ते ही मातृभाषेतून?
हो, तुम्ही बरोबर ऐकताय!
आता आपल्याला आपल्या मातृभाषेतून सुद्धा इंजिनियरिंगचं शिक्षण घेता येणार आहे.
नेमका विषय आहे तरी काय बघूया.
# पंतप्रधान मोदींची घोषणा..!
देशामध्ये पहिल्यांदा २९ जुलै २०२० रोजी “राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले होते. २९ जुलै २०२१ रोजी त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
# काय होती घोषणा?
विद्यार्थ्यांना आता ८ राज्यांतील १४ इंजिनियरिंग कॉलेज मधून मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ, बांगला या पाच भाषांतून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे. आहे ना मजेशीर!
# कोणी दिले निर्देश?
इंजिनिअरिंगची भारतातील सर्वोच्च संस्था “अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, (AICTE)” द्वारा मातृभाषेतून शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
# काय असेल प्रक्रिया?
लवकरच मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंगचे धडे मराठीतून देण्याची सुरुवात केली जाईल. आधी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील महाविद्यालयात इंजिनियरिंग मराठीतून शिकवण्याचा प्रयत्न पुर्ण झाल्यावर इतर महाविद्यालयांनी संबंधित प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
# तज्ञांची मत मतांतरे?
तज्ञांनी यावर वेगवेगळी मतं मांडली आहेत. ती आपण बघू शकता बीबीसी मराठीच्या ह्या व्हिडिओ मध्ये
# निर्णयाचा फायदा काय?
ग्रामीण भागातील मुलांच्या मनात असणारा न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल. आज पर्यंत जे विद्यार्थी इंजिनियरिंग अभ्यासक्रमातील भाषेची काठिण्य पातळी बघूनच मागे हटायचे, ते आता कुठेतरी थांबेल.
# आव्हान काय?
कुठलीही नवीन संकल्पना अंमलात आणण्यासाठी आधी त्याची पूर्वतयारी गरजेची असते. पंतप्रधानांचा हा निर्णय एक आव्हान असल्याचे सत्य आपण नाकारू शकत नाही.
# पूर्णतः मातृभाषेतून शिक्षण!
पूर्णतः मातृभाषेतून शिक्षण हे शक्य होऊ शकणार नाही. कारण, काही पारंपरिक शब्द हे आपण इंग्रजीतूनच वापरत आलो आहोत. त्यामुळे त्या शब्दांचा वापर अभ्यासक्रमात तसाच करणे गरजेचा ठरेल.
# नोकरीत अडचण?
राष्ट्रीय शिक्षण धोरण हे आकलन सोप्पं करण्यावर भर देताना दिसून येते! मात्र, ते करत असता आपण स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता तर खुंटवत नाही ना? हा विचार ही महत्वाचा..!
# मध्यम वर्गाचा प्रश्न सुटला?
इंजिनियरिंग शिक्षण हे मातृभाषेतून मिळणे याचा कितपत फायदा होईल, हे आपण नंतर ठरवूया पण, मूळ प्रश्न हा आहे की, जो वर्ग इंजिनियरिंग ही खर्चिक बाब म्हणून त्याच्याकडे बघत होता त्यांचं काय? तो प्रश्न अजूनही तसाच पडून आहे!
# शिक्षण पद्धती!
मातृभाषेतून शिक्षण देण्याची ही संकल्पना यशस्वी झाली असं तेव्हाच म्हणावं लागेल, जेव्हा शिक्षण पद्धतीत बदल घडून येतील. आजवर जे विद्यार्थी इंजिनीयरिंगची परीक्षा म्हणजे, “एका रात्रीचा खेळ!” समजायचे त्यांच्या ज्ञानाला कुठेतरी ह्या संकल्पनेचा फायदाच होईल.
संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा.
👉 इंजिनीयरिंग विषयी मोदींची घोषणा!
# तुम्हाला काय वाटतं?
शासनाच्या या घोषणेनंतर तुमच्या मनात ही काही प्रश्न असतील ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या लेखाविषयी काय वाटतं ते ही आम्हास कळवा.
अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.

लेखिका
खुशाली ढोके
लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.
khushi.dhoke111@gmail.com