Home » Campus Placement व्हावं असं वाटत असेल तर हा Marathi Blog तुम्ही वाचायलाच हवा! (Effective tips for campus placement of college students. Marathi Blog)

Campus Placement व्हावं असं वाटत असेल तर हा Marathi Blog तुम्ही वाचायलाच हवा! (Effective tips for campus placement of college students. Marathi Blog)

Reading Time: 3 minutes

साध्या कॉलेजमध्ये Campus placement म्हणजे अगदी मृगजळच झालंय जणू. खरं तर Campus placement साठी कशी तयारी करावी लागते, ते वाचा माझ्या या लेखात…. 

‘कैम्पस प्लेसमेंट’ का?

       आज वाढती लोकसंख्या आणि वाढती बेरोजगारी  हे जागतिक व्यवस्थेसमोर असलेलं मोठ्ठ संकट आहे. त्यात इंजिनिअरिंग क्षेत्रात तर नोकरी मिळणे चिंतेची बाब बनली आहे. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी भारतात साधारणत: एक मिलियन इंजीनियर्स बाहेर पडतात.

त्यातल्या सत्तर टक्के लोकांना job मिळत नाही. आणि ज्यांना मिळतो त्या तीस टक्के मधील ऐंशी टक्के लोकांना मनासारखा job मिळत नाही. आशा परिस्थितीमधे चांगल्या रेप्युटेड कंपनीत फ्रेशर म्हणून काम करायचे असेल तर ‘कैम्पस प्लेसमेंट’ हा योग्य पर्याय आहे. दुसरे कारण म्हणजे सध्या कैम्पस हे रेप्युटेड कंपनीचेच असतात त्यामुळे चांगले भविष्य घडू शकते.

Photo by Michael Burrows from Pexels
‘ऑन-कैम्पस प्लेसमेंट’ आहे काय?

जसे की सर्वांना माहित आहे. अंतिम वर्षी  वेगवेगळ्या कंपन्या इंजिनिअरिंग college /University मधे रिकृटमेंट ड्राइव्ह घेतात. आणि त्यातून योग्य लोकांची निवड करतात .कॅम्पस प्लेसमेंटला साधारणपणे खालील टप्पे असतात.

कौशल्य मूल्यांकन चाचणी,
गट चर्चा,
पॅनेल मुलाखत फेरी,
तांत्रिक चाचणी,
जनरल एचआर फेरी आणि सिलेक्शन झाल्यानंतर ऑफर लेटर दिले जाते.

त्यामधे टर्मस् आणि कंडीशनस् तसेच इतर बाबीही लिहलेल्या असतात. Documentation वगैरे झाल्यानंतर  कामाविषयी ओरियंटेशन (माहिती) दिले जाते. त्यानंतर जॉब रोल समजावला जातो, ट्रेनिंग दिले जाते आणि तुमचा त्या कंपनीतून कार्पोरेट दुनीयेचा प्रवास सुरू होतो.

‘प्लेसमेंटच्या तयारीला सुरूवात कधी करायची?’

     प्लेसमेंट drive सामान्यत: तुम्ही शिकत असलेल्या college आधारे अंतिम वर्ष सुरू होण्यापूर्वी किंवा आधी आयोजित केल्या जातात. चांगले प्लेसमेंट इंजिनिअरिंग collages इंटरव्ह्यूला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना आधीच तयार करतात.

“असा बनवा तुमचा  CV!’

    तुमचा पहिला job तुमच्या पुढील करिअरसाठी  परिणामकारक ठरत असतो आणि परिणामतः तुमच्या आयुष्यासाठीही. त्यामुळे त्यासाठी शक्य तितकी मेहनत करा जेणेकरून इच्छित कंपनीमधे job मिळेल. यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तुमचा CV बिल्ड करणे आणि तुमची सोशल प्रोफाईल निटनेटकी ठेवणे.

त्यासाठी www.linkedin.com वरती तुमचे अकाउंट उघडा. जे प्रोफेशनल असायला हवं.

उदाहरणार्थ नीटनेटका प्रोफाईल फोटो आणि प्रोफेशनल बायो. तसेच तुमच्या इतर सोशल मिडिया अकाउंट वरून निर्थक गोष्टी हटवून ते नीटनेटके बनवा. तुमचा CV बनवण्यासाठी ऑनलाईन शोधा तसेच मित्र किंवा आप्तेष्टांकडून माहिती मिळवा. सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, तुम्ही ज्या कंपनीमधे प्लेसमेंटसाठी प्रयत्न करणार आहात त्या गरजेप्रमाणे प्रत्येकवेळी CV मधे बदल करून घ्या.

‘ऑनलाईन Aptitude’ अवघड असते का?

    सुरवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो की, इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मधे तुम्ही ऐवढे ट्रेन होता की तुमची विचार करण्याची शक्ती प्रचंड वाढलेली असते. आणि त्यामुळे अशी aptitude अवघड जात नाही. त्यामधे व्हर्बल ऐबिलिटी (इंग्रजी व्याकरण आणि शुद्धलेखन), रिझनिंग , Quantitative  प्रश्न असतात. त्यासाठी तुम्ही वेगवेगळी पुस्तके रेफर करू शकता किंवा www.indiabix.com या वेबसाईटवर ही आभ्यास करू शकता.

इंटरव्ह्यूची भिती वाटते?

    इंटरव्ह्यू हा तुमच्यात जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक गुण आहेत त्यांची पडताळणी असते. तसेच तुम्ही जे काही आजवर शिकला आहात तेच तिथं वापरून स्वतःला सिद्ध करायचे असते. तयारी करताना तुमच्या इंजीनियरिंग स्ट्रीमच्या कोअर सब्जेक्टवर भर द्या. जर कोडिंग किंवा लेखी परीक्षा असेल तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पहा किंवा ऑनलाईन शोधाशोध करा.

आणि सिल्याबस बुक्सपेक्षा इतर टेस्ट्सचा न चुकता सराव करा. एचआर इंटरव्ह्यू  हा एक मूलभूत इन्टरन्स  मानला जातो ज्यामध्ये एचआर तुम्हाला सामान्य प्रश्न विचारतो,  उमेदवार कंपनीसाठी योग्य असेल तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि गेज समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या कंपनीमधे का सहभागी व्हायचे आहे,  वेतनाची अपेक्षा काय आहे यावर प्रश्न असू शकतात.

     माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला सांगावसं वाटते कि, तुमचा आत्मविश्वास आणि संभाषण कौशल्य फार मदत करतं. मग भले तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसले तरी माहिती आहे तेवढंच सांगून समोरच्याची पसंती मिळवता यायला हवी.

‘ऑन-कैम्पस प्लेसमेंट’ नाही झालं तर ?

      ऑन-कैम्पस प्लेसमेंटमधे जर तुम्हाला नोकरी मिळाली नाही. तर तुमच्याकडे ऑफ-कैम्पस हा पर्याय असतो. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन पहावे लागेल. त्यांच्या साईटवरील ‘करिअर’ या टॅबवर गेले असता हवी ती माहिती तसेच Contact डिटेल्स मिळून जातील जेणेकरून तुम्ही योग्य व्यक्तीशी संपर्क करून तुमच्या काॅलिफिकेशन च्या नोकरीसाठी अर्ज करू शकाल.
       अशाप्रकारे तुम्ही ऑन-कैम्पस साठी प्रयत्न करू शकता, नाही झाले तर ऑफ-कैम्पससाठी प्रयत्न करू शकता. आणि शेवटी नाहीच जमलं तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. कारण,  मार्ग भरपूर सापडतात पण आपली चालायची तयारी पाहिजे.

कवी दुष्यंत कुमार यांच्या या ओळी कमालीचं बळ देतात आणि प्रयत्नवादी रहायला सांगतात.

“कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, 

एक पत्थर तो तबियत से उछालो यारों॥”

 

कवी दुष्यंत कुमार

तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

बालाजी गुंडाप्पा साखरे.

(लेखक इंजिनिअर आहेत. सध्या L&T Construction Ltd. या कंपनीमधे कार्यरत आहेत)

Balajisakhareg@gmail.com

अनेकवचन: 15 thoughts on “Campus Placement व्हावं असं वाटत असेल तर हा Marathi Blog तुम्ही वाचायलाच हवा! (Effective tips for campus placement of college students. Marathi Blog)”

  1. पिंगबॅक: Most important 6 thing required for a Guaranteed job | नोकरी मिळेल! पण, तुमच्यात हवेत हे ‘सहा गुण’! | तरुणाई डॉट कॉम

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!