Home » Best Marathi Keyboard for Android/ios (100% Genuine)| आता मराठी लिहिणं झालं सोप्यात सोपं!

Best Marathi Keyboard for Android/ios (100% Genuine)| आता मराठी लिहिणं झालं सोप्यात सोपं!

Reading Time: 4 minutes

मोबाइल वर मराठी टाइपिंग करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतोय?

नेट वर सर्च करून कितीही चांगला की-पॅड घेतलात, तरी बराच वेळ तुम्ही त्यात मराठी टाइपिंगसाठी काना, मात्रा अन् स्पेशल कॅरेक्टर शोधत बसता?

खूप प्रयत्न केले तरी काही जोडाक्षरं लिहिलीच जात नाहीत?

बरं, एवढं सारं अनुभवून ही तुम्हाला झटपट मराठी टाइपिंग करायचीय?

होय, मग तुम्ही योग्य वाचत आहात!

नमस्कार तरुणाई!

आज, आता, इथं मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, एका अशा टॉप लेवल मराठी एंड्रॉइड आणि आय. ओ. एस. मध्ये चालणाऱ्या टाइपिंग की बोर्डची जो तुमचा मराठी टाइपिंगचा ताण चुटकीसरशी कमी करेल.

या app चे नाव आहे,  Microsoft SwiftKey Keyboard‘.

संगणकाच्या युगात दिवसेंदिवस आधुनिक क्रांती घडवणाऱ्या माइक्रोसॉफ्ट या १००% विश्वसनीय अन् टेक्नोसॅव्ही कंपनीनं जुलै २०१० मध्ये हा कीबोर्ड सर्वांसाठी लॉन्च केला.  तेव्हापासुन, मागील अकरा वर्षात हा किबोर्ड फक्त मराठीच नाही! तर, जगभरातील (३००+ एंड्रॉइड) अन् (१००+ आय. ओ. एस) लिपी (Script not Language) लिहण्यासाठी #१ वर रँक करतोय!

काय आहेत याची ठळक वैशिष्ट्ये?

०१)  हा एक असा पर्सनलाईज की बोर्ड आहे .ज्यात तुम्ही निव्वळ शब्दच नाही, तर इमोजी अन् वेगवेगळ्या क्वालिटी जी. आय. एफ. सुद्धा सहज सेंड करु शकता. त्यासाठी कोणताही वेगळा चार्ज भरावा लागत नाही, सगळं अगदी निःशुल्क आहे.

०२) स्वीप टू टाइपचा ऑप्शन अन् त्यातही ऑटो करेक्ट मोड असल्यानं आपण लिहलेला शब्द वेगवेगळया सात ते आठ प्रकारे दाखवला जातो, त्यातील सुयोग्य शब्द आपण निवडू शकतो.

०३) १००+ बहुरंगी थीम उपलब्ध आहेत. ज्यात आपण आपल्याला हवी असणारी इमेज सुद्धा की बोर्ड वर लावू शकतो. टाइप केलेला शब्द इमोशन दाखवणारा असेल तर, त्या जागी लगेच इमोटीकॉन पाठवायची सोय असल्यानं संभाषण हलकं फुलकं करता येतं.

०४) खास आकर्षण: आपण एकाच वेळी तब्बल पाच भाषा त्याच लेआऊट वर टाइप करू शकतो. जसे की, इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी आणि उर्दू अशा पाचही भाषेत लिहायचं असल्यास आपल्या कीबोर्ड च्या स्पेस बार वर hi/en/mr/gr/ur अशी पाच अक्षरे दिसतात अन् आपण त्याच इंग्रजी कीबोर्ड वरून पाचही भाषा एकाच वेळी टाइप करू शकतो!

०५)  वेळोवेळी मायक्रोसॉफ्ट कडून याला अपडेट येतात. अन् काळानुसार वेगवेगळया ऍपमध्ये सुलभ अन् जलद टाइपिंग करण्यासाठी आपण तयार असतो.

तर मंडळी,

वर उल्लेख केलेला क्रमांक चार चा मुद्दा तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत लक्षणीय मानला जातो! कारण, एकाच वेळी ऑफिस, शाळा, व्यवसाय, कुटुंब अन् मित्रपरिवारातील विविध भाषिक लोकांशी संवाद साधताना एकाच कीबोर्ड वरून एकाच वेळी आपण पाच वेगवेगळया लोकांशी पाच वेगवेगळया भाषेत अस्खलित संवाद साधू शकतो, तेही पूर्ण शुद्घ! जर मला टाइप करायचं असेल, मी काही वेळात फोन करतो तर, मला लिहावं लागेल, ‘Me kahi welat phone karto’ अँड that’s it! तुम्ही इंग्रजी मध्ये टाइप कराल पण, ते सारं मराठी मध्ये टाइप केलं जाईल!

आहे ना इंटरेस्टिंग!

संस्कृत ही देववाणी असली तरी, तिचंच एक अपत्य मराठी ही भाषांची भाषा आहे. आपल्या मराठीत कित्येक अशी चिन्हं आहेत, जी अन्य कोणत्याही भाषेत सहसा वापरली जात नाहीत. त्यामुळंच इतर कोणत्याही की बोर्ड मध्ये सर्व च्या सर्व मराठी चिन्ह अंकित केलेली नाहीत. जगातील सर्वात मोठा ब्रॅण्ड असलेल्या मायक्रोसॉफ्टनं मात्र हे मराठी भाषेचं वैभव ओळखून त्यांच्या या की बोर्ड मध्ये काही अशी चिन्हं अन् जोडाक्षरं निःशुल्क दिली आहेत ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही!

ङ, ञ, ऽ (अवग्रह चिन्ह – हाक मारताना उच्चार लांबला असेल तर, तो दाखवण्यासाठी ही चिन्ह वापरली जातात), ॐ, ँ, ृ, ॅ, ॉ, त्र, श्र, ऋ, र्य, ऱ्य, ल्य, च्य, ण्य, ध्य, न्य, त्य, स्त, क्त, स्थ, व्ह, यांसारखी कित्येक कठीण जोडाक्षरं अन् लिहायला हमखास अडचण येईल असे ‘ऱ्ह’ हे जोडाक्षर इथं एका वेगळया स्पेशल की वर सेट केलेले आहे.

अक्षरं तर आहेतच पण, चिन्ह!

@, $, €, ¥, ¢, ©, ®, ™, ~, ¿, §, ¶, ° यांसारखी कित्येक चिन्ह आपल्याला सहजरित्या लिहता येतात, हेच तर याचं खास वैशिष्ट्य!

इतक्या ठामपणे आपल्याला हे सर्व कथन करण्याचा उद्देश हाच की, मी स्वतः माझ्या व्यक्तिगत आणि प्रोफेशनल आयुष्यात गेली नऊ वर्षं याच कीबोर्ड वर मराठी भाषा अस्खलित टाइप करतोय अन् तेही कोणता नवीन अडसर उत्पन्न न होता!

आनंदाची गोष्ट म्हणजे,

सदर ऍप गूगल प्ले (Android) अन् ऍपल स्टोर (ios) वर निःशुल्क उपलब्ध आहे.

काय मग,

सॉल्व झालाय ना तुमचा प्रॉब्लेम!

नक्कीच ट्राय करून पहा Microsoft SwiftKey Keyboard (👈 Download करण्यासाठी येथे क्लिक करा ) ऑप्शन; अन् विसरून जा मराठी टाइपिंग करण्याचं टेंशन!

(वरील लेख लिहण्यासाठी Microsoft SwiftKey Keyboard कडून कोणत्याही प्रकारचे प्रमोशन करण्यात आलेले नाहिये. माय मराठीची अस्मिता जपण्यासाठी अन् अधिकाधिक मंडळीनी मराठी टाइपिंग करण्यासाठी कित्येक ऑप्शन सर्च करून झाल्यावर मागच्या नऊ वर्षांत हाताला जे योग्य मटेरियल सापडलं ते मी आपल्या सर्वांसमोर सविनय सादर केलं आहे.)

असेच उत्तमोत्तम माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.

अन् हो खाली कमेन्ट मध्ये तुमचा Microsoft SwiftKey Keyboard चा अनुभव शेअर करायला विसरू नका हं!

पुन्हा भेटू काहीतरी नवीन अन् गरजेचं मटेरियल घेऊन!

चलो! सी यू सून ऽऽऽऽऽ!


लेखक

श्री. जयंत शिगवण (©मृद्गंध)

वेबसाइट : wordsmithmridgandha.com

अनेकवचन: 3 thoughts on “Best Marathi Keyboard for Android/ios (100% Genuine)| आता मराठी लिहिणं झालं सोप्यात सोपं!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!