Home » All About SSC Boards MH-CET | जाणून घ्या 10 वी नंतर MH-CET Compulsory आहे का? आणि बरंच काही…

All About SSC Boards MH-CET | जाणून घ्या 10 वी नंतर MH-CET Compulsory आहे का? आणि बरंच काही…

Reading Time: 5 minutes

दहावीचं वर्ष! हुश्….!

हिच फिलिंग आहे ना? मी समजू शकते. आणि आता आणखी एक आव्हान आहे समोर, ते म्हणजे, MH-CET!

पण, मित्रांनो घाबरु नका. ही परीक्षा म्हणजे, खूप काही अवघड प्रकार नाहीये.

हो!

तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आली आहे मी, अगदीच सोप्या भाषेत.

MH-CET काय आहे?

परिक्षा देणं गरजेचं आहे का?

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख?

परिक्षा दिली नाही तर?

या आणि अशाच काही महत्वपूर्ण प्रश्नांवर आज आपण संवाद साधणार आहोत. चला तर मग सुरू करूया.

०१) MH-CET काय आहे?

MH-CET (Maharashtra Common Entrance Test) ही एक सामायिक प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा सेल द्वारे आयोजित करण्यात येते. राज्यात अकरावी प्रवेशासाठी पहिल्यांदाच या परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी विविध महाविद्यालयीन स्तरावर ही परिक्षा घेतली जात होती. २०२१ मध्ये MH-CET परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी दहावी नंतर चांगले महाविद्यालय मिळण्याची अपेक्षा ठेवू शकतात.

०२) परिक्षा देणं गरजेचं आहे का?

MH-CET परीक्षा संपूर्णतः ऐच्छिक आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन यंत्रणेवर विश्वास आहे आणि जे त्यांना मिळालेल्या गुणांमध्ये समाधानी आहेत त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार परिक्षेत बसण्याचा वा न बसण्याचा निर्णय घेणे हे सर्वस्वी त्यांच्यावर असेल. जे विद्यार्थी MH-CET परीक्षा देतील त्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेते वेळी प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही त्यांचा उर्वरित रिक्त जागांसाठी विचार केला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जरी ही परीक्षा ऐच्छिक असली तरी, सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी जेणेकरून, त्यांना चांगले कनिष्ठ महाविद्यालय निवडता येईल. असं म्हणतात, ११ वी आणि १२ वी हे पुढचं भविष्य ठरवणारे वर्ष असतात. म्हणून, जर का इथूनच तयारीला लागलो तर, भविष्यात नक्कीच काही तरी चांगलं घडेल.

०३) फॉर्म भरण्याची शेवटची तारीख?

दिनांक २२ जुलै २०२१ या दिवशी MH-CET परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रक्रियेत खंड पडला आणि प्रक्रिया थांबवण्यात आली. आता दिनांक २६ जुलै २०२१ या दिवशी दुपारी ०३:०० वाजल्यापासून ही प्रक्रिया पूर्ववत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख, दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ निर्धारित करण्यात आल्याचे प्रकटन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत दिनांक २५ जुलै २०२१ या दिवशी जारी करण्यात आले आहे.

प्रकटन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत दिनांक २५ जुलै २०२१ (👈 येथे क्लिक करा )

०४) परिक्षा दिली नाही तर?

MH-CET परिक्षा देण्याचे बंधन कोणत्याही विद्यार्थ्यावर टाकण्यात आले नसल्याने, परिक्षा दिली नाही तर, काय? हा प्रश्न विद्यार्थांच्या मनात गोंधळलेली स्थिती निर्माण करतो आहे.

परिक्षा दिली नाही तर, काय होणार? महत्वाचं म्हणजे, आपल्या आवडीच्या महाविद्यालायातून शिक्षण घेण्यापासून मुकावं लागू शकतं! यापेक्षा मोठं नुकसान विद्यार्थी दशेत काय बरे असावे?

त्यामुळे सर्वांनी परीक्षा ही दिलीच पाहिजे.

०५) १० वी बोर्डाच्या परीक्षेत कमी मार्क्स! आता काय?

असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र शासनाने सर्वांना एकच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या परीक्षेची रूपरेषा आखली असल्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जरी कमी मार्क्स असले तरी, गोंधळून न जाता परीक्षेला बसता येईल.

०६) मला जास्त पर्संटेज आहेत. मग मला याची गरज काय?

जरी मार्क्स किंवा पर्संटेज जास्त असले तरी, ह्याच परीक्षेच्या माध्यमातून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे सोपे होणार आहे.

समजा, तुम्हाला ९५.००% मार्क्स आहेत आणि तुम्ही MH-CET दिली नाहीत आणि एक दुसरा विद्यार्थी ज्याला ७०.००% मार्क्स आहेत मात्र, तो MH-CET परिक्षा उत्तीर्ण होऊन आला असेल! अशा परिस्थितीत चांगले महाविद्यालय त्याला प्राधान्य देईल.

त्यामुळे जास्त मार्कांचा ढींडोरा न पिटता ही परीक्षा देणेच योग्य!

०७) गृहीत धरले जाणारे मार्क्स?

परिक्षा अकरावी प्रवेशासाठी असल्या कारणाने दहावीचे मार्क्स गृहीत धरले जाणार नसल्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

 • जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!

  Reading Time: 4 minutes डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी १९८६ साली गडचिरोली येथे ‘सर्च’ (SEARCH) ची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुव्यवस्थित करणे, त्यांचं सक्षमीकरण करणे यासाठी ते आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले ‘निर्माण’चे प्रवासी काम करीत आहेत. २००६ साली ‘सर्च’ सोबतच ‘निर्माण’ हा उपक्रम सुद्धा सुरू केला गेला. देशातील तरुण पिढीच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, स्वतःसोबतच स्वः पलीकडील जगाची ओळख करून देण्यासाठी, आयुष्याला पर्पजची जोड देण्यासाठी ‘निर्माण’ कार्यरत आहे. 

 • History of India in Olympic games | भारताचा ऑलम्पिक स्पर्धेतील इतिहास

  Reading Time: 6 minutes ऑलम्पिकमध्ये भारताने सर्वात आधी १९०० मध्ये भाग घेतला होता. तेव्हा भाग घेणारा एक मात्र खेळाडू “नार्मन प्रीजर्द” हा होता. १९२० ते १९८० पर्यन्त  भारताचा हॉकि या खेळात दबदबा होता. या दरम्यान भारताने टोटल  ११ पदक जिंकले, त्यात ९ सुवर्ण पदकाचा समावेश आहे. २०१६ पर्यन्त भारताने २८ पदक पटकावले आहे. त्यात ९ सुवर्ण पदक आहेत, ७ रौप्य पदक आहेत, तर १२ कांस्य  पदक आहे आणि हॉकी मध्ये सर्वात जास्त सुवर्ण  पदक आहे.

 • कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update!

  Reading Time: 4 minutes आता १००० SUBSCRIBERS आणि ४००० हजार तासांच्या WATCH TIME ची गारज नाही? आता कमवा YouTube Shorts मधून बक्कळ पैसा आणि महत्वाचं म्हणजे, त्यासाठी तुम्हाला YouTube Partner Program मध्ये सहभागी व्हायची सुद्धा गरज नाही! काय मग, आहे ना मजेशीर! तर, आज आपण जाणून घेणार आहोत, काही मजेशीर गोष्टी, ज्या मिळवून देऊ शकतात तुम्हाला बक्कळ पैसा! तो …

  कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update! अधिक वाचा & raquo;

 • Depression, suicidal behavior & anxiety | समस्या तरुणाईच्या आणि उपाय!

  Reading Time: 3 minutes

  नैराश्य म्हणजे काय?

  नैराश्य ही अशी स्थिती असते, जिथे निराशा उच्च पातळी गाठते!

  सतत दुःखी राहणे, कोणाशी बोलणं नको वाटणे, सततची नकारात्मकता, नकार पचवण्याची तयारी संपणे, कोणी काही बोललं की, सतत तेच विचार डोक्यात राहणे, आजारपणात ताण घेणे, जेवायची इच्छा न होणे इत्यादी बदल आपल्याला नैराश्यात जाणवतात.

 • How to manage time? | वेळेचे नियोजन कसे करावे?

  Reading Time: 4 minutes आज आपण वेळेचे व्यवस्थापन कसे करावे त्यामध्ये ध्येय ठरवणे, कामांना प्राधान्यक्रम देणे,कामातील चालढकलपणा टाळणे, अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, स्वतःचे कॅलेंडर तयार करणे हे बघितले तसेच वेळ राखणे म्हणजे काय आणि दिरंगाई म्हणजेच कामात विलंब का होतो, ते ही बघितले. जर ह्या गोष्टी होत असतील आणि विलंब होत असेल तर, तो कसा टाळता येईल यासंदर्भात उपाय देखील बघितले. 

०८) प्रवेश फी किती?

प्रवेश परीक्षा म्हटलं की, सर्वसामान्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे, प्रवेश फी किती असेल? तर, आनंदाची बाब म्हणजे, महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थांना प्रवेश फी नसेल. कारण, त्यांच्याकडून बोर्ड्स एक्झाम वेळेस फी घेण्यात आली होती. पण, स्टेट बोर्ड्स व्यतिरिक्त जे कोणते बोर्ड्स असतील त्यांना १७०/- ₹ अर्ज करते वेळी भरावे लागतील.

०९) वेबसाईट?

MH-CET अर्ज करण्यासाठी लिंक (👈 येथे क्लिक करा )

वरील लिंक वर क्लिक करून, आपण डायरेक्ट कँडिडेट लॉग इन या पेजवर जाऊ शकता. तिथे आपल्याला बाजूचा इंटरफेस पुरवण्यात येईल.

आपण अजून ही रजिस्टर झाला नसाल तर, न्यू कँडिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून लवकरात लवकर अर्ज करा आणि जर रजिस्ट्रेशन झाले असेल पण, अर्ज केला नसेल तर, लॉग इन करून लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्ही अधिक माहिती साठी त्यांच्या वेबसाईट वर सुद्धा संपर्क साधू शकता.

१०) हेल्पलाइन नंबर : 9823009841 (सोबत जोडलेल्या फोटो मध्ये बघावे)

११) अर्ज करतेवेळी घ्यावयाची काळजी?

०१) अचूक केंद्र निवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचेच परिक्षा केंद्र निवडणे योग्य ठरेल.

०२) माध्यम निवड :

 • परिक्षा एकुण ८ माध्यमांतून घेण्यात येत असल्याने, अचूक माध्यम निवडणे खुप गरजेचे आहे.
 • सदर नोंदवलेल्या माध्यमानुसार विद्यार्थांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार आहे.
 • सेमी इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्ज करतेवेळी नमूद केलेल्या माध्यमासोबतच इंग्रजी माध्यमातूनही प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार आहे.
 • सेमी इंग्रजी माध्यम निवड केलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून तर, सामजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र) या विषयाचे प्रश्न, विद्यार्थांना त्यांच्या अर्ज करतेवेळी नमूद केलेल्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहेत.

१२) परीक्षेचे स्वरूप?

अर्ज भरल्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे, परीक्षेचे स्वरूप! नाहीतर, व्हायचं असं की, सगळी तयारी झालीय पण, अभ्यास तेवढा राहून गेला! म्हणून, या परीक्षेचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे.

परिक्षा ही पूर्णतः दहावीच्या अभ्यासक्रमावर होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेचा विडियो

स्वरूप –

 • परिक्षा ऑफलाईन होणार असून, कोरोना परिस्थितीची संपूर्ण काळजी घेत शासन नियमावली नुसार ही परीक्षा पार पडणार असल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळात पडू नये आणि आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे.
 • परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना Optical mark recognition (also called optical mark reading and OMR) शीट पुरवण्यात येणार आहे.
 • १०० प्रश्नासाठी, १०० गुण याप्रमाणे गुणांची विभागणी असेल. जरी निगेटिव्ह मार्किंग नसली तरी, एकही गुण गमावणं परवडणारं नसेल! त्यामुळं, अचूक उत्तरं नमूद करावी.
 • परिक्षा कालावधी २ तासांचा असेल. (सकाळी ११:०० ते दुपारी ०१:००)

१३) अभ्यासक्रम?

अभ्यासक्रमात इयत्ता दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान, सामजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र) या चार विषयांचा समावेश असेल.

प्रत्येक विषयाला २५ मार्क्स याप्रमाणे वेटेज असेल.

विषयगुण
इंग्रजी२५
गणित२५
विज्ञान२५
सामाजिक शास्त्र : इतिहास – ०९, गुणराज्यशास्त्र – ०४ , गुणभूगोल – १२ गुण२५      

१४) महत्वाचे!

कोव्हिड – १९ च्या पार्श्वभूमीवर, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विषयनिहाय २५% अभ्यासक्रम/घटक-उपघटक वगळण्यात आले आहेत. त्यांचा सदर परिक्षेत समावेश करण्यात येणार नाही. याची नोंद घेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करावी.

MH-CET परीक्षा अभ्यासक्रम लिंक (👈 येथे क्लिक करा )

तर, मित्रांनो आपण सर्वांना MH-CET परीक्षेसाठी शुभेच्छा देऊ इच्छिते. भरपूर अभ्यास करा आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हा.

मला वाटतं, MH-CET या परीक्षेबाबत असणाऱ्या शंका, हा लेख वाचून काही प्रमाणात का होईना दूर झाल्या असाव्यात.

अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.


लेखिका

खुशाली ढोके

लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.

अनेकवचन: 2 thoughts on “All About SSC Boards MH-CET | जाणून घ्या 10 वी नंतर MH-CET Compulsory आहे का? आणि बरंच काही…”

 1. खुप छान माहिती सांगितली आहे तुम्ही आणि मुख्य म्हणजे मराठीत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे यामुळे पालकांचा गोंधळ नक्की कमी होण्यास मदत होईल.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!