# काय आहे योजना?
अनुसूचित जातीतील (SC) दहावीच्या परीक्षेत ९०.००% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण २ लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टीमार्फत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
अधिक माहिती आपल्याला बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावरील या घोषणेत बघायला मिळेल.
👉 बार्टी संस्था, अधिकृत घोषणा.
# संपुर्ण तपशीलवार माहिती!
०१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना २०२१-२२.
०२) अर्जदार विद्यार्थाचे आई-वडील/पालक यांनी द्यावयाच्या स्व घोषणा पत्राचा नमुना.
०३) मुख्याध्यापकांनी द्यावयाच्या शिफारस पत्राचा नमुना.
०४) आवश्यक कागदपत्रे तसेच नियम व अटी शर्ती.
०५) अंमलबजावणी कार्यपद्धती.
वरील सर्व मुद्द्यांविषयी सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा. 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे पुरस्कृत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना २०२१-२२.
# अर्ज कसा कराल?
वरील लिंक वर जाऊन PDF डाऊनलोड करा. त्यात आपल्याला “अंमलबजावणी कार्यपद्धती” या सदराखाली मुद्दा क्रमांक ०३ – बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना डाऊनलोड करून अर्जदार विध्यार्थी/पालक यांनी भरून सदर अर्ज बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा. 👇
कार्यालय पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, २८, राणीचा बाग, पुणे – ४११००१.
अर्जदाराने संपुर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून लवकरात लवकर अर्ज करावा जेणेकरून योजनेचा लाभ मिळेल.
सदर लेख गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवा.
अशाच नव नवीन माहितीपूर्ण लेखांसाठी आमच्या मराठी तरुणाई डॉट कॉम या पोर्टल वर नक्की भेट द्या.

लेखिका
खुशाली ढोके
लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.
ईमेल : khushi.dhoke111@gmail.com