Home » Depression, suicidal behavior & anxiety | समस्या तरुणाईच्या आणि उपाय!
grayscale photo of person standing on seashore

Depression, suicidal behavior & anxiety | समस्या तरुणाईच्या आणि उपाय!

Reading Time: 3 minutes

चला यावर बोलूया.

धावपळीच्या युगात आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असंख्य प्रश्न असतात. ज्याची उत्तरं आपण शोधत असतो. उत्तरं सापडली की, आपण आनंदी होतो पण, नाही सापडली तर, निराश! यालाच अनुसरून आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे –

नैराश्य आणि आत्मघाती प्रवृत्ती!

नैराश्य म्हणजे काय?

नैराश्य ही अशी स्थिती असते, जिथे निराशा उच्च पातळी गाठते!

सतत दुःखी राहणे, कोणाशी बोलणं नको वाटणे, सततची नकारात्मकता, नकार पचवण्याची तयारी संपणे, कोणी काही बोललं की, सतत तेच विचार डोक्यात राहणे, आजारपणात ताण घेणे, जेवायची इच्छा न होणे इत्यादी बदल आपल्याला नैराश्यात जाणवतात.

नैराश्य येण्याची कारणे?

नैराश्य येण्यामागे काही कारणे आहेत. ती थोडक्यात बघूया –

०१) सतत नकारात्मकता जाणवल्यामुळे नैराश्य येऊ शकते.
०२) जॉब, लग्न यासारख्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे  न घडल्याने भविष्यात सगळंच अंधकारमय आहे, सतत हेच वाटतं आणि नैराश्य येतं.
०३) सततच्या रिजेक्शन्सने स्वतः वरचा आत्मविश्वास डळमळीत होतो आणि नैराश्य येतं.
०४) माझं काहीच होणार नाही, असा नकारात्मक भाव मनात येऊन नैराश्याचे ते कारण बनू शकते.
०५) सतत कोणीतरी आपल्याच विषयी चुकीचं बोलतो आहे असं वाटतं आणि त्यामुळे ताण येऊन ते सौम्य नैराश्याचे कारण ठरते.
girl, sitting, jetty-1822702.jpg

कोण जाऊ शकतो नैराश्यात!

१४ दिवसांपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीचे मन उदास असेल किंवा त्याला सगळीकडे निराशाच दिसत असेल आणि सगळंच संपल्याची भावना सतत मनात येत असेल तर, त्या व्यक्तीची नैराश्यात जाण्याची शक्यता जास्त असते.

नैराश्य आणि संवेदना!

मानसिक आरोग्य देखील आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. ही संवेदना जागृत होणे आज खूप गरजेचे आहे. एखादा नैराश्यात असेल तर, त्याच्याशी संवाद साधण्याची संवेदनशीलता प्रत्येकात रुजने गरजेचे आहे.

उपचार आहेत?

०१) नैराश्यावर उपचार म्हणजे, सर्वप्रथम “मी नैराश्यात आहे” हे स्वतःला सांगणे. कारण, आपल्याला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत, त्यावर उपचार आत्मसात करायला आपण तयार नसतो.

०२) योग्य आहार, चांगली जीवनशैली, दिनचर्येत प्राणायाम आणि योगा सारख्या पद्धतींचा अवलंब.

०३) सकारात्मक व्यक्तिंशी संवाद.

आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया –

आत्मघाती प्रवृत्ती म्हणजे काय?

क्षणिक निर्णयातून स्वतःचे नुकसान करून घेणे म्हणजे, आत्मघाती प्रवृत्ती. नैराश्यातून माणूस आत्मघाती प्रवृत्तीकडे वळतो! हे जितकं खरं तितकंच जेव्हा, नैराश्याची भावना मनात यायला सुरूवात होते तेव्हा, आत्मघाती प्रवृत्तीचा सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना जन्म झालेला असतो.

आता हे कसे? ते आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया.

०१) सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या! हे देखील आत्मघाती प्रवृत्तीतून घडलं असं आपण म्हणू शकतो. तो नैराश्यात होता आणि त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

चूक कोणाची होती? हे एक गूढ असले तरी, तो नैराश्यात होता हे मात्र खरं!

संवादाने त्याचा जीव वाचू शकला असता असं मानसोपचार तज्ञ सांगतात. त्यानंतर खूप लोकं सोशल मीडियावर तसेच इतरांसोबत मोकळेपणाने बोलू लागल्याचं आपण बघितलं. ही सकारात्मक बाब. 

आता काही रिअल लाईफ इन्सिडन्स बघूया –

०२) एक मुलगा जो की, शाळेत अतिशय हुशार! प्रत्येकंच क्षेत्रात तो उत्साहाने सहभागी व्हायचा आणि मेहनतीने त्यात क्रमांक ही मिळवायचा. काहीच दिवसांत दहावीचे बोर्ड्स आले. त्यात त्याचा शेवटचा पेपर पाहिजे तितका चांगला गेला नव्हता. घरी परतला आणि कोणाशीही न बोलताच खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला!

असं का घडलं असावं?

त्यात, चूक कोणाची होती?

तर, इथे चूक कोणाचीच नसून, अभाव होता तो संवादाचा! जर, त्या मुलाने या विषयी आपल्या शिक्षकांना किंवा घरच्यांना कल्पना दिली असती तर, इतके टोकाचे पाऊल उचलण्याआधी त्याने थोडा तरी विचार केलाच असता.

०२) एक मुलगी अतिशय हुशार, वकृत्वात उत्तम, लिखाण अप्रतिम. मात्र, दुसऱ्यांच्या अहंकारापाई तिला संधीच मिळत नव्हती! सतत तिला कोणी तरी चांगलं करण्यापासून थांबवतो आहे असंच वाटायचं! एक दिवस ती या सर्वांपासून लांब जायचं ठरवून, घरातून निघून गेली!

२० दिवसापर्यंत जेव्हा, पोलिसांच्या तपासात तिचा कुठेही पत्ता लागला नाही तेव्हा, अचानक एक दिवस तिचा मृतदेह एका धरणाच्या काठावर आढळून आला.

इथे चूक कोणाची?

परत कोणाचीच नाही!

फक्त अभाव होता तो म्हणजे, संवादाचा!

तर मित्रांनो, नैराश्य आणि त्यातून निर्माण होणारी आत्मघाती प्रवृत्ती, यासाठी आजूबाजूचे परिसर जरी कारणीभूत असले! तरीही, त्यावर एकमेव उपाय “संवाद” हेच आहे! हे लक्षात घेत आपल्या संपर्कातील लोकांना चुकीचं करण्यापासून तुम्ही नक्कीच थांबवू शकता.

अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टलला नक्की भेट द्या.


लेखिका

खुशाली ढोके

लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.

अनेकवचन: 2 thoughts on “Depression, suicidal behavior & anxiety | समस्या तरुणाईच्या आणि उपाय!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!