Home » Ravindranath Tagore | आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी!
tagore, poets, guy-1105201.jpg

Ravindranath Tagore | आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी!

Reading Time: < 1 minute

शके १८६३ च्या सुमारास दिनांक ७ ऑगस्ट १९४१ रोजी भारताचे कविसम्राट रवींद्रनाथ टागोर निधन पावले. कवि, तत्त्वज्ञ, राष्ट्रीय पुढारी म्हणूनच नव्हे तर भारतीय संस्कृतीचे एकमेव प्रतीक म्हणून त्यांची कीर्ति त्रिखंडांत पसरलेली होती.

सन १८७५ साली हिंदु मेळावा' नावाच्या सभेत त्यांनी एक स्वतःची कविता म्हटली आणि तेव्हांपासून लोक त्यांना कवि म्हणून ओळखू लागले. त्यानंतर त्यांनी वडिलांच्याबरोबर जगभर प्रवास केला. सन १९१२ च्या दरम्यान बंगाली भाषेत 'गीतांजलि' प्रसिद्ध झाली होती. तिच्या इंग्रजी अवताराचे कोडकौतुक यीट्स, बॅडले, शॉ, एच्. जी. वेल्स आदि पाश्चात्य पंडितांनी मुक्तकंठाने केलें आणि

सन १९१३ मध्ये भारतातील या कलाकृतीस नोबेल पारितोषिक मिळालें!

रविंद्रनाथ महाकवि झाले. सदैव रणकुंडांत होरपळणाऱ्या असमाधानी पाश्चात्यांना 'गीतांजली' तील मधुर भक्तिसुधा चाखून शांति आणि समाधान मिळाले. नाटके, काव्ये, कादंब-या, गोष्टी, टीकालेख, इत्यादि रूपाने रवीन्द्रनाथ अमर आहेत. पूर्वायुष्यात टागोर यांनी राजकारणांतही भाग घेतला होता. वंगभंगाच्या चळवळीत स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांच्यावर प्रभावी कवन करून त्यांनी जनमनाची पकड घेतली होती. सन १९२० च्यानंतर ते म. गांधींच्या राजकारणाशी समरस झाले. कित्येक प्रसंगी ते गांधींचे सल्लागारही असत. रवीन्द्रनाथ यांची शिक्षणविषयक कामगिरी फार मोठी आहे. राष्ट्रीय शिक्षणाची दिशा विस्तृतपणे' शांतिनिकेतन' मध्ये अमलात आणून काव्य, गायन, नृत्य, चित्रकला यांत भारताचे वैशिष्टय काय आहे हे त्यांनी साऱ्या जगाला दाखविले. अशा प्रकारचा हा कविसम्राट, जगन्मान्य तत्त्ववेत्ता, मोठा साधु, त्रिवंड पंडित, श्रावण शु. १५ ला ( दिवंगत झाला. प्रत्यक्ष भारताचा ‘रविंन्द्र'च भर दुपारी बारा वाजता अस्त पावला.

संकलन: आदित्य असाबे

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!