Home » जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!
About NIRMAN for Youth NIRMAN is a youth initiative started by Dr Abhay and Dr Rani Bang to identify, nurture and organize the young changemakers to solve various societal challenges.

जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!

Reading Time: 4 minutes

“आयुष्यात ‘का?’ हा प्रश्न पडलाय?”

आजूबाजूला घडणाऱ्या, स्वतःच्या आत होणाऱ्या गोष्टींच्या ‘का?’ चा शोध तुम्ही घेत असाल, तर ‘निर्माण’च्या प्रवासात तुम्हाला तुमची उत्तरे नक्कीच मिळतील! 

हा प्रश्नोत्तरांचा ‘निर्माण’ प्रवास देईल तुम्हांला तुमच्या ‘का?’ चं उत्तर म्हणजेच, तुमच्या आयुष्याचा नेमकं पर्पज (purpose) काय? हे सांगणारा हा लेख!

१) काय आहे “निर्माण”?

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी १९८६ साली गडचिरोली येथे ‘सर्च’ (SEARCH) ची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुव्यवस्थित करणे, त्यांचं सक्षमीकरण करणे यासाठी ते आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेले ‘निर्माण’चे प्रवासी काम करीत आहेत. २००६ साली ‘सर्च’ सोबतच ‘निर्माण’ हा उपक्रम सुद्धा सुरू केला गेला. देशातील तरुण पिढीच्या सक्षमीकरणासाठी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, स्वतःसोबतच स्वः पलीकडील जगाची ओळख करून देण्यासाठी, आयुष्याला पर्पजची जोड देण्यासाठी ‘निर्माण’ कार्यरत आहे. 

‘निर्माण’ हा एक प्रवास आहे. “Youth For Purposeful Life.” 

२) ‘निर्माण’चा इतिहास :

जून २००६ पासून आतापर्यंत (२०२१) या प्रवासात जवळपास १५०० हून अधिक तरुण जोडले गेले आहेत. आतापर्यंत निर्माणच्या ११ बॅचेस झाल्या आहेत आणि या वर्षीच्या १२ व्या बॅच साठी नोंदणी देखील सुरू झाली आहे.

 Pic source :https://nirman.mkcl.org/

(अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.)

३) ‘निर्माण’च्या प्रवासात सहभागी कसं व्हायचं?

https://nirman.mkcl.org/ या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी फॉर्म भरता येईल. ३१ ऑगस्ट २०२१ या तारखेपर्यंत १२ व्या बॅचसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुमचा फॉर्म निवडला गेला, तर तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यातूनही तुमची निवड झाली की, लवकरच तुम्ही सुद्धा ‘निर्माण’ शिबिरात सहभागी होऊ शकता. 

nirman.mkcl.org – Home | NIRMAN – NIRMAN Mkcl – Sur.ly या संकेतस्थळावर एकदा नक्की भेट द्या.

नोंदणीसाठी👇

येथे क्लिक करा.

४) माझा वैयक्तिक अनुभव : 

अगदी काहीच दिवसांपूर्वी २३ जुलै २०२१ रोजी ‘निर्माण’चं माझं पहिलं वर्कशॉप झालं आणि खरंतर शब्दांतही न मांडता येण्यासारखा खूप सुंदर अनुभव मला आला. मागच्या वर्षी म्हणजे जून २०२० ला ११व्या बॅचसाठी मी ‘निर्माण’चा फॉर्म भरला. खरंतर सिलेक्शन होईल अशी अपेक्षाच नव्हती माझी, पण फॉर्मच इतक्या सुंदर पध्दतीने बनवलेला की, मला एक आठवडा विचार करावा लागला. त्या प्रश्नांवर आणि मग मी फॉर्म भरला, नंतर इंटरव्ह्यू झाला आणि खूप वाट पाहिल्यानंतर (कोविड मुळे) नंतर आमचं वर्कशॉप झालं. 

महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच, सगळ्या सोयीसुविधा असलेल्या चैनीच्या मुंबईतून ग्रामीण भागात अर्थात गडचिरोलीच्या जंगलात ८००-९०० किमी लांब येऊन पोहोचले. तिथला रम्य निसर्ग, जंगलात वसलेलं ‘शोधग्राम’चं कॅम्पस, तिथलं मॅनेजमेंट मग ते वेळेचं असो किंवा सोयीसुविधांचं, सो कॉल्ड सिटीज्/ मेट्रो सिटीज साठी एक आदर्शचं आहे.

या ‘शोधग्राम’ मध्ये मला खूप छान माणसं भेटली. म्हणजे, इतकी डायव्हर्सिटी की, काही जण दिल्ली, M.P, U.P, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून आले होते. त्यात काहीजण डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, फायनान्स, वकील, ऍग्री इंजिनियर, . अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी होती. ‘निर्माण’ टीम तर एकदम भन्नाट होती. या सात दिवसीय शिबिरात खूप वेगवेगळे सेशन्स झाले, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या. मजा मस्तीत सुरू केलेल्या प्रत्येक कृतीचा आउटपुट खूप मोलाचा होता. 

‘मी कोण आहे?’ पासून ‘स्वतः ला स्वीकारण्यापर्यंत’, ‘एकमेकांना समजून घेत’, ‘समाजात काय अडचणी आहेत?’ ‘तिथेे कोणते प्रश्न आहेत?’ त्यावर ‘मी काय करू शकते?’ आणि ‘कशाप्रकारे करू शकते?’ याबद्दलची स्पष्टता मला ‘निर्माण’ने दिली.

(In pic : ‘Budding Social Changemakers 🌱’ Niramnees batch 11.1 A)

५) मी काय शिकले?

 'निर्माण'ने खरंतर खूप काही शिकवलं.  त्यापैकी मला महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी -

०१) स्वतःबद्दलची स्पष्टता.

०२) माझ्या गरजा किती आहेत? आणि माझी गरज कुठे आहे?

०३) आपल्याला वाटणाऱ्या समाजतल्या अडचणी या खरंच अडचणी आहेत का? याचा शोध कसा घ्यावा?

०४) सगळ्यात महत्वाचं, “To reach across, go Deep.”

६) तुम्हांला यातून काय फायदा होईल? 

आजच्या घडीला आपल्या देशात ५०% लोकसंख्या ही २८ वर्षे वयोगटाच्या खाली आहे म्हणजेच, तरुण पिढीचा (१८-२९ वर्षे) वयोगट जास्तीत जास्त आहे. इथून पुढच्या १० वर्षांत (२०२१-२०३१) हा दर कमी कमी होत जाईल. 

“You are never going to be as young as of today.” 

या काळात आयुष्यात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना ‘निर्माण’ ही एक वाट ठरणार आहे. 

“काहीतरी हटके करायचंय, पण कसं? आणि का?” याची उत्तरं शोधताना आयुष्याचा पर्पज गवसेल, जो या जीवनाला एक अर्थपूर्णता देईल. माणूस म्हणून जगताना एक समाधानी, अर्थपूर्ण आयुष्य जगता येईल. आणखी काय हवं??? आपलं काम आणि आयुष्य यातला सुवर्णमध्य साधण्याची ‘निर्माण’ ही एक चांगली संधी आहे.

मग करताय ना अप्लाय येत्या १२ व्या बॅचसाठी…. नक्की करा.

https://nirman.mkcl.org/ या संकेतस्थळावर नक्की भेट द्या, त्यावर तुम्हांला ‘Food for Thought’ या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आर्टिकल्स वाचायला मिळतील, तुम्हांला आवडलेले आर्टिकल्स तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये आमच्यासोबत शेअर करू शकता तसेच तुमचे काही अनुभव असतील तर तेही कॉमेंट करा. 

अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.

आणि काही अडचण आल्यास तुम्ही माझ्याशी ई-मेल आयडी वरून  देखील संपर्क साधू शकता. 

दिव्या देवकर

B.sc (Hons.) Agriculture (4th year)
E-mail I’d  : devkardivya2021@gmail.com

Instagram : instagram.com/_divya.01_

अनेकवचन: 9 thoughts on “जाणून घ्या काय आहे ‘निर्माण’? तरुण-तरुणींना होऊ शकतो खूप फायदा!!”

  1. मस्त लिहिलंय दिव्या… पुढच्या मुलांना याचा उपयोग होईल. जेणेकरून ते चंगळवादी बनणार नाहीत. निर्माणचा प्रवास म्हणजे पर्पजफुल प्रवास.

  2. पिंगबॅक: How to manage your time ? | वेळ कसा मॅनेज करावा ? वेळेचे नियोजन कसे करावे | जाणण्यासाठी वाचा हा ब्लॉग... | तरुणाई डॉट क

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!