Home » आज गुरुपौर्णिमा! जाणून घ्या या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व!

आज गुरुपौर्णिमा! जाणून घ्या या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व!

Reading Time: 3 minutes

गुरु गुण लिखा न जाय….!

सब धरती कागज करू, लिखनी सब बनराय

सात समुद्र कि मसी करू, गुरु गुण लिखा न जाय

– संत कबीर

साऱ्या पृथ्वीला कागद, सर्व जंगलांना लेखणी आणि सात समुद्रांची शाही बनवून लिहिले तरी, गुरुंचे गुण कोणी लिहू शकणार नाही. हा आशय वरील अभंगाचा आहे. संत कबीर यांनी हे वर्णिले आहे.

आज गुरुपोर्णिमा, भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे. गुरु हा शब्द, संस्कृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने समजला जातो गुरु हा आपल्या शिष्याचे अज्ञान दूर करून, जीवनावर प्रकाश टाकतो. आषाढ पौर्णिमेला महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी ४ वेदांचे ज्ञान मानवाला दिले. त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानाला कायम स्मरणात ठेवण्यासाठी म्हणून, गुरुपोर्णिमा साजरी केली जाते.

जो जो जयाचा घेतला गुण | तो म्यां गुरु केला जण |
गुरूसी पडले अपारपण | जग संपूर्ण गुरु दिसे ||

असे सांगून अवधुतानी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व ३ प्रकारात त्यांनी वर्णिले.

एक गुरू सद्गुण अंगीकारासाठी, दुसरा गुरू अवगुण त्यागण्यासाठी, तिसरा आणि महत्वाचा गुरू ज्ञान प्राप्तीसाठी.

गुरु साठी देवांनी सुद्धा कष्ट घेतले. भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली, संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्त्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, संत नामदेव साक्षात विठ्ठलांशी भाष्य करीत असत.

मुळात भारतीय संकृतीत गुरूला नेहमीच पूज्यनीय मानले जाते.

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे | त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे |
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी | तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही ||

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व ठिकाणी आपले सद्गुरू  पाहता आले  पाहिजे. आपल्याला जर अध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर, सद्भावाने चरणांची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी, पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे.

गुरुचे अनेक प्रकार आहेत.
०१) पृच्छक गुरु
०२) चंदन गुरु
०३) अनुग्रह गुरु
०४) कर्म गुरु
०५) विचार गुरु
०६) वस्तल्य गुरु
०७) स्पर्श गुरु

गुरु शिष्य सबंध

अध्यात्मिक उन्नती करणाऱ्या साधकासाठी गुरुचे महत्त्व अधिक असते. पण, गुरुचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक!

शिष्याने नेहमी आदरयुक्त असावे, नेहमी सेवा करावी, खोटे कधी बोलू नये, वाचन पाळावे, अपशब्द बोलू नये, दुराचार करू नये, मारहाण करू नये, आपल्या गुरूचा नेहमी आदर करावा.

गुरुप्राप्तीसाठी काय करावे?

सामोरे श्री गुरुदेवरूप आले | ज्ञानचक्षुवीण कैसे काळे ||

ओळख पटेना जरी तुम्हासी | लीन व्हावे श्रीचरणी |

देतील ओळख स्व:स्वरुपाची | शुद्ध प्रेमे चित्त वेधी ||

गुरु शोधून कधीच सापडणार नाही. कारण, गुरुत्त अगदी काना एवढे आहे आणि  साधकाला तेवढी समज कधीच नसते. गुरु स्वतःहून शिष्याची निवड करतात. गुरु जेव्हा भेटतील तेव्हा, तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण होईल.

गुरूपौर्णिमेच्या औचीत्यावर प्रसिद्ध मराठी गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेले सुंदर श्री गुरु अष्टक ऐका!
( सौजन्य: AaryaSA Official )

संत कबीरांचे अर्था सहित काही दोहे आहेत. त्यावरून, आपल्याला गुरुचा अर्थ समजण्यास मदत मिळते.

दोहे –

गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय

बलिहारी गुरु अपने, गोविंद दियो बताय

– संत कबीर
अर्थात,  गुरु आणि देव एक साथ उभे असतांना तुम्ही कोणाला नमस्कार करणार, गुरूला कि, देवाला? अशा परीस्थित गुरूच्या पायावर डोके टेकवले म्हणजे, त्यांच्या आशीर्वादाने देवाचे दर्शन करण्याचे भाग्य आपल्या नशिबी लाभते.

कुमती कीच चेला भर, गुरु ज्ञान जल होय

जनम – जनम का मोरचा, पाल मै डारे धोय

– संत कबीर
अर्थात, कुबुद्धीच्या चिखलाने माखलेल्या शिष्याला ती घाण धुण्यासाठी गुरूचे ज्ञानरुपी पाणीच उपयोगी ठरते. अनेक जन्माजन्माचे कुकर्म गुरु एका क्षणात नष्ट करतो. हा गुरूचा महिमा आहे.

गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढी – गढी  काढे खोट

अन्तर हाथ सहार दे, बाहर बाहे चोट

– संत कबीर
अर्थात,  गुरु कुंभार असेल तर, शिष्य माठ (पाण्याचा घडा ) आत मधून हाताचा आधार देत बाहेरून त्याच्यावर मारा करत गुरू त्याला दुर्गुनांपासून मुक्त करतो.

गुरु समान दाट नही, याचक शिष समान

तीन लोक कि संपदा, सो गुरु दिन्ही दान

– संत कबीर
अर्थात, गुरूसारखा ज्ञान देणारा इतर कोणीही नाही आणि शिष्या सारखा नम्र ज्ञान घेणाराही नाही. तिन्ही लोकांच्या संपत्ती पेक्षा किती तरी पट उच्च ज्ञान गुरूने दिले आहे.

गुरु को सर रखिये, चलिये आज्ञा माही

कहे कबीर त दास को, तीन लोको भय नाही

– संत कबीर
अर्थात,  गुरूला आपला डोक्यावरचा मुकुट मानून त्यांच्या आज्ञेचे पालन करा. कबीर म्हणतात, अशा शिष्याला तिन्ही लोकात भिती नाही.

अशा रीतीने, मी माझ्या लेखणीला विराम देतो. पुन्हा एकदा सर्व गुरुजनांना गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास जर हा लेख आवडला असेल तर, आपल्या अनमोल प्रतिक्रिया जरूर कळवा. मराठी भाषा जनमनापर्यंत पोहचवण्यासाठी आमच्या साईटला नक्की भेट द्या.

लेखक

विशाल नवनाथ वाघ

लेखक बी. ई. इलेक्ट्रोनिक्समध्ये शिक्षण घेत आहेत.

अनेकवचन: 4 thoughts on “आज गुरुपौर्णिमा! जाणून घ्या या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व!”

  1. विशाल न वाघ

    धन्यवाद समृद्ध आणी अक्षय तुमच्या प्रतिक्रिया मला पुढील लेखणासाठी प्रोस्ताहित करतील .

    धन्यवाद 🙏🏿🤝

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!