Home » सेक्स एज्युकेशन

सेक्स एज्युकेशन

Reading Time: 3 minutes

लैंगिक आरोग्य, समज गैरसमज, नपुंसकत्व, मासिक पाळी आणि असे अनेक महत्वाचे विषय वाचा इथे.

याबद्दल बोलणं
काळाची गरज आहे!

लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे? याबद्दल या पानावर उहापोह होणार आहे.
पोर्न पाहून चुकीच्या पद्धतीने शिक्षित होण्यापेक्षा शास्त्रीय आणि जाणकार लोकांकडून माहिती जाणून घेण्यात नक्कीच फायदा आहे, नाही का?

लैंगिक शिक्षण
का आणि कशासाठी?

हेल्लो मित्र आणि मैत्रिणींनो,
भारतीय इतिहास अभ्यासला तर असं लक्षात येतं कि, शारीरिक संबंधांना आपण घाणेरड्या नजरेने कधीच पाहिलं नाहीये. कामसूत्र फेमस असण्याचं हे एक कारण आहे. आपण पूर्वीपासून निर्मितीची असीम ताकद म्हणून त्याकडे पाहत आलो आहोत.

पण अलीकडे सेक्स म्हणजे काहीतरी विचित्र कृत्य असा समज प्रचलित झाला. TV पाहत असताना आपण Durex ची जाहिरात आली कि, सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात.

संशोधकांच्या मते गेल्या दशकात दोन काळजी करण्यासारख्या गोष्टी घडल्यामुळे चिंतेची बाब समोर आली आहे.

१. योग्य गर्भनिरोधक न वापरण्याची सवय.
२. बळजबरी लैंगिक संबंधांचे दर वाढले आहेत, विशेषत: दारूच्या आहारी गेल्यामुळे.

बलात्कार आणि विनयभंग याचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलं आहे (त्याचं कारण गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदवण्याचं प्रमाण वाढलंय हे देखील असू शकतं.).

इंटरनेटवर उपलब्ध असलेले पोर्नोग्राफिक विडीओ पाहून लैंगिक शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्याने वेगळेच शारीरिक व मानसिक प्रोब्लेम्स तरुणांमध्ये वाढत आहेत. जसे कि,

१. आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि आपल्या आकाराबद्दल लाज वाटणे,
२. परफेक्ट फिगरच्या अपेक्षेमुळे संभोगाच्या वेळी उत्तेजनेत येणारं अपयश (समोरच्याचे शरीर पोर्न-स्टारसारखे परिपूर्ण नसल्याने),
३. अत्यंत हानिकारक आणि धोकादायक लैंगिक कृत्ये करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा होणे.
४. नितळ, प्रेमळ आणि मानवी सहवासाची आवड नष्ट होणे इत्यादी.

पोर्नोग्राफिक कंटेंटमुळे लहान मुलांच्या व तरुणांच्या मनात दुर्दैवानेअश्लील अशी लैंगिक संबंधांची अवास्तव प्रतिमा तयार होते. ज्यामुळे वास्तविकतेत त्या अनुभवांची अपेक्षा केली जाते. आणि अर्थातच ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही.

कमी वयात गर्भधारणेचे प्रकारही घडताना आपण पाहतो. आपण सगळ्यांनी हे मान्य करायला हवं कि, आपल्या ऐकण्यात पाहण्यात हे प्रकार आहेत. फक्त त्याकडे पाहून न पहिल्या सारखं आपण करतो.

या सगळ्याचं कारण सेक्स एज्युकेशनकडे केलं गेलेलं दुर्लक्ष!

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाई डॉट कॉमवर सेक्स एज्युकेशन हे सदर.

ज्यात आपल्याला वाचायला मिळेल नपुंसकत्व, हस्तमैथुन, मासिक पाळी, आपलं शरीर इत्यादी बाबतीत यथायोग्य माहिती. सेक्स एज्युकेशन सदरातले लेख वाचून अभिप्राय नोंदवायला विसरू नका.

चलो, बाय!!


Photo by Charles Deluvio on Unsplash
पोर्नमधून मिळणारं ज्ञान सेक्स एज्युकेशनच आहे?

…जसजशी मुलं मोठी होतात तसतसं पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढत जातं आणि मग त्याची जास्तीच सवय लागली की, त्याचं व्यसनात रूपांतर होतं…

Photo by Inzmam Khan from Pexels
जाणून घ्या लक्षणे नपुंसकतेची, अशी घ्या काळजी.

…पुरुषांना संभोग करण्याची शक्ती नैसर्गिकरित्या प्राप्त झालेली असते. लैंगिक अवयवांचा व्यवस्थित विकास न होणे हे नपुंसकत्वाचे सामान्य कारण आहे…


Photo by Sora Shimazaki from Pexels
मासिकपाळी अपवित्र का मानली जाते?

…मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामुळे स्त्रीला अत्यंत शारीरिक त्रासाला सामोरे जावं लागतं आणि तिला त्या काळात मानसिक आधाराची गरज असते , हे आजच्या बऱ्यापैकी तरुण मुलांना कळतं आणि ते त्यांच्या परीने बायकोला , मैत्रिणीला मदतही करतात…

Photo by Polina Zimmerman from Pexels
तरुण मुलांचं मानसिक आरोग्य

…Backdoor जास्त वापरला जात नसला तरी, आपातकालीन परिस्थितीत त्याचीच आठवण सर्वात आधी येते. तसंच मुलांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाताना काही त्रास झाला, अडचण आली तर, त्या backdoor सारखी त्यांना तुमची आठवण यायला हवी…

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!