Home » सोशल मीडिया वापरताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर होऊ शकतं मोठं नुकसान!

सोशल मीडिया वापरताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर होऊ शकतं मोठं नुकसान!

Reading Time: 3 minutes

आज सोशल मीडिया ही जणू माणसाची मूलभूत गरज झाली आहे!

मी असं का म्हणाले असेल बरं?

कारण आजकाल उठता बसता मोबाईल आपल्या हातात असतो. या छोट्या यंत्राच्या मदतीने आपण आज बाहेरच्या जगाशी जोडले गेलो आहोत. प्रत्येक घटना मिनिटा मिनिटाला आपल्याला मिळते आहे.

आणि या जगाला आपल्या प्रत्येकाशी जोडणारा दुवा म्हणजे, “आंतरजाल” (Internet). याच इंटरनेटच्या सहाय्याने आज विविध सामाजिक माध्यमं आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत.

आपल्याला माहीत असलेली आणि सर्वांच्याच परीचयाची काही सामाजिक मध्यमं जसे की – इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर इत्यादी.
या आणि अशा आणखी काही इतर मध्यमातून आपण बाहेरच्या समाजाशी जोडले गेलो असल्याने त्याला आपण “सोशल मीडिया” असे म्हणतो.

आपल्याला ही मध्यमं भरमसाठ माहीती पुरवत आहेत. एका क्लिकवर आज आपण कुठल्याही क्षेत्राची माहीती सहज मिळवू शकतो.

Photo by Tracy Le Blanc from Pexels

आज भारतात बसून आपण साता समुद्रापलिकडे एखाद्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. तिथे आपली फ्रेंचाईजी टाकू शकतो. इतकंच नाही तर, एखाद्या तंत्रज्ञानाची सुद्धा आदान – प्रदान आपण या सामाजिक माध्यमातुन करू शकतो.

पण जसे याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवं. काही बाबींचा जर विचार केला नाही तर सोशल मीडिया खूप मोठं नुकसान करू शकतं.

चला तर पाहुयात कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी.

१. सोशल मीडिया वापरताना वाटणारी काळजी!

या सगळ्या घडामोडी, आभासी जगात घडताना कुठे तरी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो! खरंच हे माध्यम सुरक्षित आहे का? हा प्रश्न अजून ही तसाच पडून आहे. कारण, या माध्यमांची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, आपण आता ते सुरक्षित आहे वा नाही याकडे बघत देखील नाही.

बाहेरच्या जगाशी संवाद साधताना आपल्या व्यक्तिगत माहितीचा कुठेही गैरवापर होणार नाही याची भीती मनात नेहमीच असते. त्याच असुरक्षिततेला दूर करण्यासाठी आज विविध कायदे असल्याचे आपण बघतो.

पण, त्या कायद्यांचा धाक कुठवर आहे? हा एक प्रश्न अजुन आहेच!

२. फेक न्युजचा अतिरेक

सध्या आपण बघतो व्हॉट्सऍप, फेसबुक सारख्या समाजमाध्यमांतून चुकीच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. त्या खोट्या बातम्यांच्या दुनियेत सुशिक्षित सुद्धा गुरफटले जात आहेत. कोणीतरी शासकीय नोकरीची खोटी जाहिरात काढतो काय आणि लाखो परीक्षार्थी त्याला बळी पडतात काय!

सध्या ऑनलाईन शॉपिंगची भलतीच क्रेझ न्यू जनरेशन मध्ये दिसून येते. काहींना तर त्याचं इतकं वेड की, तुटपुंज्या सवलतींसाठी स्वतःची पाकिटं खाली करून बसण्याचं दुर्भाग्य त्यांना लाभलं.

३. यंग माईंड्स जात आहेत सोशल मीडियाच्या आहारी

सध्या यंग जनरेशन सोशल मीडियाच्या आहारी गेलेली दिसून येते. चूक काय , बरोबर काय यात न पडता आपण युवक वर्गांच्या उमेदीच्या वयोगटावर बोलूया. साधारण १५ – ३५ हा सरासरी वयोगट आपण बघितला तर, आज प्रत्येकालाच स्वतःला सिद्ध करायचं आहे असं दिसून येतं. खरंच ती धडपड स्वतःस सिद्ध करण्यासाठी आहे की, आणखी दुसऱ्या हेतूने हे एक गूढच आहे!

कारण, लोक वास्तविक जीवन आणि काल्पनिक जीवन यातील फरक पूर्णपणे विसरून गेल्याचे जाणवते. उमेदीची वय वर्षे समाज माध्यमांवर घालवून काहीच साध्य होणार नाही! त्यातून नवीन काही उत्पादित साध्य होणार असेल तर ते चांगले. मात्र तसं घडताना दिसत नाही.

४.सोशल मीडियावरून अपशब्दांचा भडिमार

विविध समाज माध्यमांवरून अपशब्द वापरला जाण्याचा प्रकार सर्रास घडताना आपण बघतो. त्यात मोठ – मोठी मंडळी सामील असल्याच्या बातम्या मागील वर्षी घडून गेल्या!

एखाद्याला कुठल्या माध्यमातून आणि कुठल्या पातळीत जाऊन आपण बोलतो याचे भान आपणच ठेवले पाहिजे.
एखाद्या महिलेवर अभद्र टिप्पणी करून आपण आपली योग्यता तर दाखवत नाही ना? हा प्रश्न आपण स्वतःस विचारावयास हवा.

५. सोशल मीडिया आणि कोरोना!

समाज माध्यमांच्या तोट्यांप्रमाणेच त्याचे फायदे सुद्धा असल्याचे दिसून येते. ज्यात सध्या कोरोना काळात आणखीच उभारी मिळाली आहे. कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा सगळीकडे सर्व काही ठप्प पडलेलं तेव्हा एकमेव माध्यम म्हणजे, सोशल मीडिया हाच लोकांच्या जगण्याचा आधार बनला होता हे ही तितकंच खरं आहे.

६.सोशल मीडिया आणि आव्हाने.

समाज माध्यमांचा विस्तार जितका दिवसेंदिवस वाढत आहे तितकीच त्यातील आव्हानांची टक्केवारी सुद्धा झपाट्याने वाढत आहे. इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन पेमेंट यात विशेष लक्ष देणे खूप गरजेचे झाले आहे. मिनिटाला अकाउंट बॅलन्स शून्य होण्याच्या घटना अजून तरी ताज्या आहेत.

या सर्व घडामोडी घडत असता आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. जसे की, सेफ आणि ऑथोराईज्ड पेमेंट ऍप्लिकेशन वापरूनच कुठलेही पेमेंट करणे, रेटिंग्ज किंवा कस्टमर फीडबॅक बघितल्याशिवाय शॉपिंग साईटला भेट न देणे. हे आणि असे काही प्रतिबंधात्मक उपाय वापरून आपण स्वतःची सामाजिक जीवनात वावरताना खबरदारी घेऊ शकतो.

तुमचे मत काय?

आमच्या ह्या ब्लॉग वर आपले मत नक्की नोंदवा. आपल्याकडे माहिती असल्यास नक्कीच आमच्या सोबत सहभागी व्हा. त्याचसोबत इतर विषयावर लिहिलेले ब्लॉग आपण वाचू शकता आमच्या वेब साईटला भेट देऊन.

लेखिका

खुशाली ढोके

लेखिका MCom आहेत व महिला सबलीकरण या विषयावर काम करतात!

khushi.dhoke111@gmail.com

धन्यवाद

अनेकवचन: 2 thoughts on “सोशल मीडिया वापरताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर होऊ शकतं मोठं नुकसान!”

  1. भिती तर नक्कीच वाटते ,कारण या जगात. सोशल मीडियावर बरेच वाईट अनुभव येतात ,जसे की कोणाची तरी मैत्री स्विकारल्यानंतर तो आपल्या मानसिकतेचा विचार करीत नाही , रात्री दहा नंतर चॅटिंग करणार काय संदेश देईल सांगता येत नाही

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!