
शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन. त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे ५४ वर्षे प्रतिनिधीत्व केले.
सलग ११ वर्षे एकाच मतदारसंघातून निवडून येण्याचा करुणानिधींचा विक्रम गणपतरावांनी मोडला होता. अत्यंत तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. ते विधीमंडळाच्या अधिवेशनाला देखील लालपरी एस टी ने जायचे.
राजकारणातील अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे व निष्कलंक नेतृत्व म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहीले जात होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऋषीतुल्य नेतृत्व गणपतरावांच्या रुपाने हरपले.
भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🏻
लेखन: तेजस सन्मुख