आज आपण सर्वांना माहीत असलेल्या पण उघड न बोलल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक म्हणजे “मासिक पाळी” किंवा मासिक धर्म , मासिक स्त्राव या विषयावर चर्चा करणार आहोत
शारीरिक त्रासापासून ते गर्भधारणेपर्यंत मासिक पाळीचा संबंध येतो. बऱ्याच जणांना याबद्दल योग्य माहिती नसते किंवा ते माहीत करून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत.
या लेखात आपण त्याबद्दल असलेली वास्तविकता, समज आणि समाजाने घालून दिलेले गैरसमज याबद्दल माहीत करून घेणार आहोत. या लेखात तुम्हाला अत्यंत योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मासिक पाळी म्हणजे नेमकं काय ?
मानवी शरीरात अनेक गुणधर्म आहेत, त्यापैकीच स्त्रियांच्या शरीरात असलेला हा गुणधर्म. दर महिन्याच्या 3–4 दिवस प्रत्येक स्त्रीला हा त्रास जाणवतो.
योनीमार्गाद्वारे रक्तस्त्राव होऊन त्यामुळे अशक्तपणा येतो.
मासिक पाळी ही साधारणतः 12–15 व्या वर्षी सुरू होते आणि 45–50 व्या वर्षी मेनोपॉज या प्रक्रियेद्वारे थांबते.
मासिक पाळीच्या चक्राचे 3 टप्प्यात विभाजन करता येते. ते पुढीलप्रमाणे :-
1. Follicular Phase
2. Ovulatory Phase
3. Luteal Phase
1. Follicular Phase :- (अंडे बाहेर सोडले जाण्याआधी)
या टप्प्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या दरम्यान ओवरीमध्ये फोलिकल (अतिशय बारीक कोश किंवा ग्रंथी) चा विकास होतो. या फेजच्या सुरुवातीला गर्भाशयाचे
अस्तर(एंडोमेट्रीअम) त्यासाठी लागणारे पोषक द्रव्य भरून फुगते.
Follicular टप्पा हा 13–14 दिवसांचा असतो आणि सर्वात जास्त बदल सुद्धा याच फेज मध्ये होतात. लुटीनायझींग संप्रेरकांचे प्रमाण वाढले की हा टप्पा संपतो आणि परिणामी अंडे बाहेर सोडले जाते.(Ovulation)
2. Ovulatory Phase :- (अंडे बाहेर सोडले जाणे)
ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात.
अंड्याचे फलन न झाल्यास १४ दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते.अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात.
ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते.
3. Luteal Phase :- (अंडे बाहेर सोडल्यानंतर)
ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात.
अंड्याचे फलन न झाल्यास १४ दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते.अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात.
ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते.
अशाप्रकारे हे मासिक पाळीचे चक्र असते.
मासिक पाळीबद्दल असलेली मानसिकता…
मासिक पाळीला बरेच जण “नियमित, अडचण, monthly problem, मासिक” यासारख्या अनेक संज्ञा वापरतात. मुळात निसर्गाने तयार केलेल्या या
प्रक्रियेला आपण अडचण म्हणतो हीच खरी अडचण आहे.
आजसुद्धा या विषयावर उघडपणे बोलण्यास मनाई आहे. याच कारण फक्त आणि फक्त मानसिकता आहे.
पुरुष तर पुरुष पण स्त्रियासुद्धा या विषयावर कधी उघडपणे बोलतांना दिसत नाहीत.
“औरत की सबसे बडी दुष्मन औरत होती है” या जुन्या बॉलिवूड फिल्मच्या डायलॉगप्रमाणे या 4 दिवसांत त्या स्त्रीला तिच्या घरात तिच्यापेक्षा वयस्क असणाऱ्या
स्त्रीकडून वेगळीच वागणूक दिली जाते. “इथे हात नको लावू , इथेच पडून राहा , देवघरात जाऊ नकोस , बाहेर जाऊ नकोस” असे कित्येक शब्द त्या स्रीला ही
जाणीव करून देतात की जस काय तिने बाई बनून एखादा अक्षम्य गुन्हाच केलाय.
मुळात त्या स्त्रीला त्या वेळी गरज असते ती फक्त पॅड आणि आधार याच दोन गोष्टींची.
तिथे समाजाने घालून दिलेले नियम आणि इतर बुद्धिजीवी लोकांचे तत्वज्ञान ऐकण्याची तिची इच्छा नसते. तिला त्या वेळी फक्त आधाराच्या दोन शब्दांची गरज
असते बस्स.
काही स्त्रिया तर यापुढे जाऊन एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर तिथे ही गोष्ट आडवी येऊ नये म्हणून काही pills घेतात आणि येणारी मासिक पाळी पुढे
ढकलतात.
याहून अधिक शोकांतिका काय असेल की, त्या स्त्रीला तिच्या स्त्रीपणाला दडपून ठेवावं लागतंय?
मासिक पाळी आणि पुरुष…
सध्या 100% नसले तरी बऱ्याच पुरुषांचा मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आधीच्या पिढीपेक्षा आताची पिढी ही मासिक पाळीला अडचण किंवा चुकीचं असं काही मानत नाही.
मध्यंतरी अक्षय कुमारच्या आलेल्या “Padman” या चित्रपटाने सुद्धा बराच बदल घडवून आणला.
4 दिवस बायकोला न शिवणारा आणि तिला वाळीत टाकल्याप्रमाणे वागवणारा पुरुष ते बायकोला स्वतः जाऊन pad आणून देणारा पुरुष आणि तिची काळजी
घेणारा पुरुष हा बदल खूप महत्त्वाचा आहे आणि तो आता घडतोय.
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामुळे स्त्रीला अत्यंत शारीरिक त्रासाला सामोरे जावं लागतं आणि तिला त्या काळात मानसिक आधाराची गरज असते , हे आजच्या बऱ्यापैकी तरुण मुलांना कळतं आणि ते त्यांच्या परीने बायकोला , मैत्रिणीला मदतही करतात.
लहानपणी घरात याबद्दल काहीतरी लपून बोलतांना किंवा बाहेर कुठं एखादं गुपित सांगितल्याप्रमाणे लोक बोलत तेव्हा आश्चर्य वाटायचं पण आता कळतंय की हे
नैसर्गिक आहे.
मासिक पाळी आणि समाज…
समाजात अनेक पुरातन परंपरा आणि रितींमुळे या क्रियेबद्दल अनेक गैरसमज पसरवून या मासिक पाळीला विटाळ आणि अभद्र ठरवण्यात आलं.
काही वासनेसाठी आतुरलेले तर याला “आचारसंहिता” सुद्धा म्हणायला कमी करत नाहीत. कोरोना मुळे आपण लॉकडाऊन झालोय पण दर महिन्याला स्त्रियांची काहीही चूक नसतांना त्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे लॉकडाऊन केलं जातं त्याबद्दल काय ?
काही आदिवासी समाजांमध्ये मासिक पाळीदरम्यान स्त्रीला वस्तीबाहेर झोपडीत ठेवतात , आता प्रश्न हा पडतो की त्यांच्यात आणि आपल्यात फक्त वेशभूषेचा फरक आहे का कारण दोन्ही मानसिकता तर सारख्याच आहेत. स्त्रियांनी विशेषतः तरुण मुलींनी हक्काने याबद्दल आवाज उठवायला हवा आणि स्वतः योग्य ती माहिती घेऊन जागरूक राहायला हवे. शेवटी हक्क हा लढाई केल्यावर च मिळत असतो , हा इतिहास आहे. फक्त इथे लढाई ही विचारांची आहे. स्त्रियांची मासिक पाळी जरी महिन्याच्या अंतराने येत असली तरीही समाजाची “मानसिक पाळी” ही अविरत चालू आहे. समाजाचा या बाबतीत दृष्टिकोन जेव्हा बदलेल तेव्हाच स्त्रिया या बाबतीत मोकळेपणाने बोलू शकतील.
एक सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल की , “माझ्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही स्त्रीला जर अचानक अस काही जाणवल की तिची पाळी आली आहे आणि ती सार्वजनिक ठिकाणी आहे तर माझ्या परीने होईल ती मदत मी तिला करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर मी कुठल्याही मासिक पाळी मध्ये असणाऱ्या स्त्रीला विटाळ किंवा घाण म्हणून न बघता तिला मानसिक आधार देऊन तिच्या मनात या गोष्टीबद्दल असलेला तिरस्कार काढण्याचा प्रयत्न करेन.” ही शपथ प्रत्येकाने स्वतःला द्यायला हवी.
माझ्या या लिखाणामुळे किमान 4–5 मुलींनी जरी हक्कासाठी आवाज उठवला आणि 4–5 मुलांनी जरी सकारात्मकता तयार करून तिचा प्रसार केला तरी माझ्या
या लेखनाचं सार्थक झालं असं समजेल.
शेवटी एवढंच सांगेन की, माझ्या काही गोष्टी तुम्हाला पटल्या असतील किंवा नसतीलही.
पटल्या तर त्यावर विचार करा पण हा बदल आपल्याला स्वत:पासूनच घडवावा लागेल.
धन्यवाद!
लेखक :-
शुभम रमेश वाढोनकर
Instagram:- shubhw_1999
Mobile:- 9834455641
Bio :- MPSC Aspirant , लिखाणाची आवड आणि अवांतर वाचनाची आवड.
Very nice….keep writing like this, whatever you are writing to bring awareness in the society, it is making us feel very proud.
Thank You Payal..🤗🙏🏻
The supportive comment you’ve given will surely help me to write something more to spread awareness and knowledge.
I request you to share this article with more and more ladies especially teenagers. ☺️☺️🙏🏻🙏🏻
मासिक पाळी हा निसर्गाचा नियम आहे, नैसर्गिक नियम आहे.याच काळात मानवाची निर्मिती क्रिया सुरू असते पण आमच्या काही लोकांनी या क्रियेला अपवित्र असे संबोधले आहे हे चुकीचे आहे म्हणून आज समाज प्रबोधनाची गरज आहे ,या वेळी स्वच्छता पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे पण ते अपवित्र नाही. माझे मत 🙏
अगदी बरोबर सर..💯✔️
पटलं तुमचं मत🤗🙏🏻
स्वच्छता आणि आरोग्य यांना महत्त्व द्यायलाच हवे पण त्याचबरोबर काही अनिष्ट रूढी आणि परंपरा यांना सुद्धा मुळासकट उपटायला हवे.
“जर मासिक पाळी असणारी स्त्री विटाळ तर मग त्याच स्त्रीपासून जन्माला आलेले आपण पवित्र कसे ?” हा प्रश्न त्या स्त्रीला विटाळ म्हणणाऱ्या सज्जनांना करायला हवा आपण सर्वांनी..🙏🏻🙏🏻
Nice bro 👍 really it’s to much needed information for our society…🙂
u r always a good & inspiring writer for any topic 😊
I proud of you …👍good luck …
Thank You Sister..
Keep Your blessings on me always..
Share this information and this article to more and more teenagers you can.🤗🙏🏻
पिंगबॅक: Love and Affairs | Read about this in Marathi | 💖 प्रेम आणि आजची तरुणाई… 💖 | तरुणाई डॉट कॉम