Home » Sex Education and Porn videos | पोर्नमधून मिळणारं ज्ञान सेक्स एज्युकेशनच आहे?
affection, kiss, lady-1294965.jpg

Sex Education and Porn videos | पोर्नमधून मिळणारं ज्ञान सेक्स एज्युकेशनच आहे?

Reading Time: 2 minutes

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

सेक्स एज्युकेशन हा आपल्या आयुष्याशी निगडित एक अत्यंत महत्त्वाचा विषय असूनही आजही त्यावर उघडपणे बोलणं टाळलं जातं. सेक्सबद्दल उघडपणे बोलणारी व्यक्ती ही ‘तसल्या’ प्रकारची असल्याचं आज एकविसाव्या शतकातही समजलं जातं.
तसं पाहायला गेलं तर शालेय वयातच मुलांमध्ये सेक्स ह्या विषयाबद्दल कुतूहल निर्माण होतं. त्यांना त्याविषयीच योग्य ते मार्गदर्शन वेळीच मिळालं नाही तर ते इतर माध्यमातून माहिती मिळवायचा प्रयत्न करतात.


जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा स्मार्टफोन नव्हते, सेन्सॉर बोर्ड जरा जास्त दक्ष होतं, वेबसिरीज वगैरे सारख्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे सेक्स किंवा शारीरिक आकर्षण ह्या गोष्टी आम्हाला बऱ्याच उशिरा कळल्या.

सध्याची परिस्थिती पाहता आताच्या पिढीला सेक्स एज्युकेशनची सर्वात जास्त गरज आहे कारण स्वतःच्या दोन्ही पायावर नीट उभंही राहता न येणाऱ्या मुलामुलींच्या हातात हल्ली स्मार्टफोन असतो.

थोडंसं कळू लागलं, शाळेत मित्रमैत्रिणी भेटले की, मग बालक पालक चित्रपटामधल्या विशूची जबाबदारी त्यांच्यापैकी कुणीतरी उचलतं आणि मग सेक्स हा विषय पहिल्यांदा मुलामुलींसमोर येतो तो ‘पॉर्न’ ह्या माध्यमातून.
त्यामध्ये आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांना अत्यंत बीभत्सपणे दाखवलं जातं आणि मग सेक्स तसाच असतो असा गैरसमज आपण करून घेतो.

जसजशी मुलं मोठी होतात तसतसं पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढत जातं आणि मग त्याची जास्तीच सवय लागली की, त्याचं व्यसनात रूपांतर होतं.

पॉर्न हा परदेशातील एक व्यवसाय आहे हेच मुळी आपल्याला समजत नाही. भारताने सर्व जगाला कामसूत्र दिलं आहे पण आता आपल्या देशातच त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सेक्सकडे एक भावना म्हणून न पाहता फक्त शरीराची एक गरज म्हणून पाहिलं जातं आणि त्यामुळेच अनेक पाशवी विचार प्रवृत्त होतात.

मागे एकदा बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या विद्यार्थ्याची एका पत्रकाराने मुलाखत घेतली होती. त्याने त्या पीडित मुलीवर जबरदस्ती का केली असं त्याला विचारलं असता त्याने अत्यंत निरागसपणे उत्तर दिलं कि, ‘मी जे काही पाहिलं ते मला करून पाहावसं वाटलं. यामध्ये माझं काय चुकलं हेच मला अजून कळलेलं नाही.’ ह्या उत्तरावरूनच आपल्या लक्षात येईल की सेक्स बद्दलची जागरूकता किती महत्वाची आहे.

सेक्स ही आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाची, गरजेची गोष्ट आहे आणि त्याबाबतची जागरूकता मुले जाणती झाल्यावर त्यांच्या मनात निर्माण करायला हवी.

जागरूकता निर्माण करणं ह्याचा अर्थ त्यांना सेक्स करण्यास प्रवृत्त करणं असा नसून त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबाबत माहिती देऊन त्यांचे गैरसमज दूर करणं असा आहे कारण या ना त्या माध्यमातून हा विषय त्यांच्यासमोर येतोच.

तो चुकीच्या पद्धतीने त्यांच्यासमोर येत नाही ना हे पाहायला हवं. हल्लीचे चित्रपट, वेब सिरीज ह्यांमधील दृश्ये लक्षात घेता सेक्स एज्युकेशन गरजेचंच आहे असं मला तरी वाटतं!

©प्रतिलिखित

https://pratikpravinmhatre.com/

अनेकवचन: 2 thoughts on “Sex Education and Porn videos | पोर्नमधून मिळणारं ज्ञान सेक्स एज्युकेशनच आहे?”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!