Home » Ten ideas to save your money effectively. पैसा सेव्ह करण्याचे सोपे दहा उपाय.
piggy bank, gold, money-2889046.jpg

Ten ideas to save your money effectively. पैसा सेव्ह करण्याचे सोपे दहा उपाय.

Reading Time: 2 minutes

मनी प्लान म्हंटलं की, मराठी माणसाचा पहिला गैरसमज म्हणजे याची गरज फक्त श्रीमंतांनाच असते. जसे की, डेव रामसे, सुझी ओरमन, वॉरन बुफ्फे आणि इतर!!


‘आपण गरीब बुआ, हे आपल्याला काही जमणार नाही!’
अशी मराठी माणसाची मानसिकता पाहायला मिळते.

पण मराठी मित्र आणि मैत्रिणींनो, हा विषय खूप महत्वाचा आहे. तरुण वयात पैसा व्यवास्थापन जमलं तर संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकतं.

चला तर आज आपण स्थिर आणि भक्कम ग्रोथ प्लॅन्स पाहूयात.

Photo by Mayur Bhutada from Pexels

पैशांच्या काही फॅक्ट ज्या स्वीकारल्या आणि ज्याचं पालन केलं तर तुम्ही सुद्धा खूप श्रीमंत होऊ शकता.


1.आर्थिक शिस्त लावा
पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्वाचे असते. प्लानिंग करुन जर तुम्ही पैसा खर्च केलात तर तुमच्याकडे खूप सारी रक्कम शिल्लक राहू शकते. खर्च हा फायनांशिअल प्लानिंगचा महत्वपूर्ण हिस्सा आहे.

2.खर्च करण्याआधी…
आपल्या प्रत्येक वैयक्तिक खर्चासाठी प्लानिंग गरजेचे आहे. सर्व खर्चांची एक यादी तयार करायला हवी. वस्तूंच्या महत्वानुसार त्यांना प्राथमिकता द्यायला हवी. सर्वात महत्वपूर्ण खर्च यादीत वर राहतील. त्यापेक्षा कमी महत्त्वाचे खर्च असे अनूक्रमे लिहायला हवे.

3.अशी वाचवा रक्कम
आता वरील यादीत सर्वात वर लिहिलेल्या वस्तूसाठी पैसे बाजूला काढून ठेवा. सर्वात खाली लिहिलेल्या वस्तूसाठी खर्च करणे गरजेचेच आहे का ? याचा विचार करा. तो खर्च टाळून ही रक्कम वाचवू शकता.

4.किती रक्कम शिल्लक?
महिन्याच्या शेवटी गुंतवणूक केल्यानंतर, विमा हप्ता दिल्यानंतर, आणि इतर आवश्यक बिलांचे पैसे दिल्यानंतर इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उरते हे लिहून ठेवा.

5.वळा इतर गरजांकडे
ही रक्कम खर्च करण्याऐवजी गुंतवणूक करा. आपल्या गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करा त्यानंतर इतर गरजांकडे वळा. त्यानंतर उरलेल्या पैशातून मौजेच्या वस्तू घेऊ शकता.

6.असा वाचवा पैसा
जास्तीत जास्त पैसे वाचविण्यासाठी डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घ्या. एखाद्या वस्तूची ऑनलाईन किंमत जाणून घ्या. क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा.

7.प्लानिंग करा
मोठी खरेदी करण्याचे आधी प्लानिंग करा व तसे पैसे साठवून ठेवा. उदा. मोठ्या फॅमिली पिकनिकला जाण्याआधी एक वर्ष आधीपासूनच सेव्हिंग करायला सुरुवात करा. यामूळे तुम्हाला पैशांचे ओझे कमी वाटेल.
हा पैसा गुंतवल्यास अतिरिक्त व्याजही मिळेल आणि खर्च करण्यासाठी जास्त रक्कमही जमा होईल.

8.क्षमेतेपेक्षा अधिक खर्च करू नका
आपल्याला होत असलेल्या कमाईपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यावर तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.
पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड हे आपल्याला क्षमेतेपेक्षा अधिक खर्च करण्यास प्रेरित करतात. या जाळ्यात अडकून आपण अशा वस्तूदेखील घेतो ज्यांची आपल्याला गरज देखील नाही.
पण त्यांचे हफ्ते भरणे ही मोठी चिंता होऊन जाते.

9.क्रेडिट कार्डचा वापर स्मार्टली करा
क्रेडिट कार्डचा वापर हा डिस्काऊंट ऑफर, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स इ. लाभ घेण्यासाठी करायला हवा. पर्सनल लोनचा वापरही खूपच महत्त्वाच्या गरजेसाठीच करायला हवा.

10.तुमच्या सवयींकडे लक्ष द्या
आपल्याला खर्च करण्याची सवय लागली आहे हे अनेकांना समजण्यासाठी उशीर होतो. त्यामूळे खर्चात वाढ होत राहते.
आपल्या खर्च करण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करु नका.
जर आर्थिक सल्लागाराकडून हे प्लानिंग केलात तर जास्त सोयिस्कर ठरु शकते.


मला खात्री आहे कि पैसे व्यवस्थापन आपल्या लक्षात आले असेल.

 लेख कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.

लेखिका

कांचन राठोड

लेखिका सध्या खाजगी कंपनीत कार्यरत आहेत.

ईमेल: kanchanrathod130720@gmai.com

अनेकवचन: 39 thoughts on “Ten ideas to save your money effectively. पैसा सेव्ह करण्याचे सोपे दहा उपाय.”

  1. प्रवीण कसब

    खूप छान !!!
    लेखिकेने खूप महत्वाचा विषय इथे खूप सुंदर रित्या सादर केला आहे आजच्या तरुणाईला याची गरज आहे आणि हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने इथे लिहिल्याबद्दल लेखिकेचे धन्यवाद !!!!!

  2. छान मागर्दशन करता मॅडम तुम्ही..असच लिहीत राहा..लिहिणाऱ्याने लिहीत राहणं आणि वाचकांनी वाचक बनणं हेच जिवंतपणा च लक्षण आहे👌👌👌

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!