Home » Money & Investment tips | गुंतवणूक कशी, कधी, कुठे करावी? तरुणांनी अवश्य वाचा!
pocket watch, time, clock-2061228.jpg

Money & Investment tips | गुंतवणूक कशी, कधी, कुठे करावी? तरुणांनी अवश्य वाचा!

Reading Time: 3 minutes

उत्तम व्यवहाराद्वारे जोडलेला पैसा तसाच पडून राहण्यात काय अर्थ? त्यात काळानुसार वाढ अपेक्षित! वाढत्या गरजा, महागाई आणि भविष्याचा विचार करता पैशात वृद्धी होणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. योग्य माहिती घेऊन आपल्याला जमतील तितके पैसे गुंतवले पाहिजेत, बचत केलीच पाहिजे.

Photo by Lukas from Pexels
रसाळ आंब्यांनी लगडलेली आमराई अस्तित्वात येण्यासाठी अनेक वर्षे लागतात.

त्यासाठी योग्य नियोजन, चांगली रोपे, मशागत आणि निगराणी अशा अनेक गोष्टींची गरज असते. मेहनती सोबतच चांगल्या हवामानाचीही साथ लागते. गुंतवणुकीचेही असेच! अपेक्षित लाभ मिळण्यासाठी आर्थिक नियोजन आणि त्याप्रमाणे शिस्तशीर कार्यवाही यांची आवश्‍यकता असते. योग्य तऱ्हेने गुंतवणूक केल्यास हाती असलेल्या शिल्लक  रकमेतूनही आपल्याला हवी तशी रक्कम गुंतवता येणे शक्‍य होऊ शकते. त्यासाठी काही तत्त्वे मात्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.

०१. कमी वयात सुरुवात:

गुंतवणुकीला जितकी लवकर सुरवात करू, तितका त्याचा लाभ अधिक मिळत जातो.

वयाच्या २५ व्या वर्षी सुरू केलेली बचत वयाच्या ३० व्या वर्षी सुरू केलेल्या अधिक रकमेच्या बचतीपेक्षा जास्त होते.

कारण, गुंतवणूक जास्त काळासाठी असते.

०२. चक्रवाढ व्याजाची करामत:

लवकर बचत सुरू केल्याचा प्रमुख फायदा म्हणजे, “चक्रवाढ व्याज“. म्हणजेच, व्याजावर व्याज मिळत जातो. त्यामुळे अधिक फायदा होतो.

३० व्या वर्षी ०१ लाख रुपये गुंतवले, तर ६० व्या वर्षी (१०% दराने) १७.४५ लाख होतात, तर ५० व्या वर्षी ०५ लाख रुपये त्याच दराने गुंतवल्यास ६० व्या वर्षी फक्त १३ लाख होतात.

०३. नियमित गुंतवणूक:

दर महिना सातत्याने गुंतवणूक केल्यास मिळणारा फायदा लक्षणीय असतो.

१००० रुपये ३० वर्षे १०% व्याजदराने गुंतवल्यास मिळणारी रक्कम २२ लाख होते.

थोडक्‍यात, लहान रक्कम दीर्घ काळ नियमितपणे गुंतवल्यास फायदा निश्‍चित आहे.

गुंतवणूकिची माध्यमे

महागाईच्या दरापेक्षा अधिक दराने परतावा हवा असेल! तर, पारंपरिक गुंतवणुकीच्या साधनात गुंतवणूक करून लाभदायी ठरणार नाही. बँकेचे व्याजदर कमी झाले आहेत. पोस्टातील मासिक योजनेचा बोनस वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीवर ८ % पेक्षा अधिक व्याजदर मिळू शकत नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीवर मिळालेला वार्षिक सरासरी परतावा असा आहे.

सोने : ९-११ %
बँक मुदत ठेव : ६ -७  %
बीएसई सेन्सेक्‍स : १४  -१६  % (Equity Shares)
महागाई दर : ७ -८  %

इक्विटी शेअर्समधल्या गुंतवणुकीवर मिळालेला परतावा सर्वाधिक आहे आणि तसे करण्यात जोखीम अर्थातच आहे. पण, ज्याला जास्त परतावा हवा आहे, त्याला योग्य ते व जबाबदारीने धाडस करायलाच हवे. यासाठी म्युच्युअल फंडाचा राजमार्ग खुला आहे. जोखीम व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची सोय इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये आहे. सर्वसामान्य माणूस ५०० रुपये इतक्‍या कमी रकमेतून या योजनांत गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी डिमॅट खाते लागत नाही (अधिक माहिती साठी येथे क्लिक करा). म्युच्युअल फंड व्यावसायिकरीत्या सर्वसामान्य जनतेचा पैसा जोखीम कमी करून भांडवल बाजारात गुंतवतात. ज्याचा लाभ गुंतवणूकदाराला मिळतो.

भारतीय अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. वाढत्या विकासदराचा फायदा येथील कंपन्यांना होणार व त्याचा लाभ ते त्यांच्या भागधारकांना देणार. आपण म्युच्युअल फंडाद्वारे या लाभात निश्‍चितच सहभागी होऊ शकतो. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये म्हणजेच SIP द्वारे (Like Monthly Deposit Plan In Bank) सहभागी होऊन लवकरात लवकर इक्विटी म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत गुंतवणूक करावी. त्या दीर्घ काळाचा विचार करावा. शेअर्सच्या बाजारभावातल्या वाढ-घटीने विचलित होऊ नये. कारण, लक्षात ठेवा,

“इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे तसेच न करणेही जोखमीचे आहे.”

आयुष्यात जोखीम न घेता नुकसान होण्यापेक्षा, जोखीम घेऊन फायदा उचलणे कधीही चांगले. हाच बोध या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई पोर्टलला नक्की भेट द्या.


लेखिका

कांचन राठोड

लेखिका सध्या खाजगी कंपनीत कार्यरत आहेत.

ईमेल: kanchanrathod130720@gmail.com

अनेकवचन: 11 thoughts on “Money & Investment tips | गुंतवणूक कशी, कधी, कुठे करावी? तरुणांनी अवश्य वाचा!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!