Home » When to buy an Insurance? | कोणत्या वयात खरेदी करावा विमा आणि काय आहेत याचे फायदे !
slip up, danger, careless-709045.jpg

When to buy an Insurance? | कोणत्या वयात खरेदी करावा विमा आणि काय आहेत याचे फायदे !

Reading Time: 2 minutes

असं म्हणतात, व्यवस्थित विचार करून जेवढ्या लवकर एखादा निर्णय घेतला तितका त्याचा फायदा जास्त.

विमा खरेदी करण्याचा निर्णय सुद्धा पुढे आयुष्याला आधार देणारा ठरतो. हेच जाणून घेणार आहोत आपण या लेखाच्या माध्यमातून.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही प्रकारच्या अकस्मात जोखमी किंवा दुर्घटनांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी २० व्या वर्षी जीवन विमा उतरवावा. कमी प्रीमियम दर हा याचा फायदा आहे.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात (Hectic life) कधीही कोणासोबतही कोणतीही दुर्घटना (Accidents) घडू शकते. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला (Family) आर्थिक समस्यांपासून (Financial Problems) वाचवण्यासाठी सर्वांनीच विमा पॉलिसीचा (Insurance policy) आधार घ्यायला हवा. पण, यासाठी योग्य ती विमा पॉलिसी निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून, ती आपल्यासाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी गरज पडल्यास फायद्याची ठरू शकेल.

Photo by RODNAE Productions from Pexels

०१) योग्य वेळी पॉलिसी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

विमा पॉलिसी खरेदी करण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात की, ही विमा पॉलिसी कधी आणि कोणत्या वयात खरेदी करावी आणि कोणता विमा प्लॅन त्यांच्यासाठी योग्य असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आपल्याला देणार आहोत.

०२) कोणत्या वयात खरेदी कराल विमा पॉलिसी?

२० व्या वर्षी जीवन विमा उतरवल्यास, कमी प्रीमियम दराचा फायदा आहे.

२५ व्या वर्षी टर्म विमा घेणाऱ्या व्यक्तीला ३० वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ०७ हजार रुपयांचे प्रीमियम भरावे लागते तर,

३० वर्षीय व्यक्तीला त्यावेळी पॉलिसी घेतल्यास ०९ हजार रुपयांचे प्रीमियम भरावे लागते. याचाच अर्थ, वय जास्त असल्यास जीवन विमा पॉलिसीचे प्रीमियमही अधिक भरावे लागतील.

०३) कमी वयातच करा आरोग्य विमा!

जीवन विम्यासारखाच आरोग्य विमाही कमी वयातच उतरवणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण योग्य आरोग्य विमा योजनेमुळे कोणताही रोग झाल्यास त्याच्या इलाजासाठी वर्षानुवर्षे कव्हर करत राहतो. जीवन आणि आरोग्य विम्याप्रमाणेच घराचा विमा उतरवणेही गरजेचे आहे. हे करताना आपल्या सर्व गोष्टींचे योग्य ते मूल्यमापन करा जेणेकरून, या सर्व गोष्टींचे योग्य ते लाभ आपल्याला मिळू शकतील.

विमा खरेदी करण्यासाठी योग्य वय काय? हे आज हा लेख वाचून आपल्या लक्षात आलेच असेल. अशाच नव नवीन विषयांवर आणखी लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई पोर्टलला नक्की भेट द्या.


लेखिका

कांचन राठोड

लेखिका सध्या खाजगी कंपनीत कार्यरत आहेत.

ईमेल: kanchanrathod130720@gmail.com

एकवचनी: 1 विचार “When to buy an Insurance? | कोणत्या वयात खरेदी करावा विमा आणि काय आहेत याचे फायदे !”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!