Home » कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update!
youtube, earning, subscription-5061859.jpg

कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update!

Reading Time: 4 minutes

आता १००० SUBSCRIBERS आणि ४००० हजार तासांच्या WATCH TIME ची गारज नाही?

आता कमवा YouTube Shorts मधून बक्कळ पैसा आणि महत्वाचं म्हणजे, त्यासाठी तुम्हाला YouTube Partner Program मध्ये सहभागी व्हायची सुद्धा गरज नाही!

काय मग, आहे ना मजेशीर!

तर, आज आपण जाणून घेणार आहोत, काही मजेशीर गोष्टी, ज्या मिळवून देऊ शकतात तुम्हाला बक्कळ पैसा! तो ही एका Shorts Performance वर!

हो! बरोबर ऐकताय.

काय आहे Shorts Fund?  कोण असेल पात्र? यात पेमेंट कसा मिळू शकेल? 

या आणि अशाच काही महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न, मी या ब्लॉग मधून करणार आहे. 

चला तर मग सुरू करूया!

# काय आहे Shorts Fund?

Shorts Fund हा १०० दशलक्ष डॉलरचा ($100 Million) फंड आहे. जो २०२१ आणि २०२२ दरम्यान पात्र निर्मात्यांना (Creators) वितरीत केला जाणार आहे. प्रत्येक महिन्यात US $100 ते US $10,000 पर्यंत Shorts Fund मधून निर्माते (Creators) कमावू शकतील.

# कशी होईल रकमेची गणना?

चॅनेलवर महिन्यातील Shorts व्ह्यू (View) आणि प्रेक्षक वर्ग कुठला आहे त्यानुसार Performance Metrics गणला जाईल.

# Shorts Bonus कोणाला मिळू शकेल?

Original Shorts निर्मात्यांना (Creators) Shorts Bonus मिळू शकेल. पण, जरी ते YouTube partner program चा भाग नसले तरी, त्यांना Shorts Bonus मिळू शकेल.

# कोणता Shorts गणला जाईल?

चॅनेलवरील मागील महिन्याच्या Shorts व्हिडिओपैकी एक Shorts Video हा Performance Metrics साठी गणला जाईल.

# कोणत्या महिन्यातील व्ह्यू (View) गणले जातील?

फक्त ज्या महिन्यात Shorts Video पोस्ट केलाय त्या महिन्यातलेच व्ह्यू (View) गणले न जाता, २०२१ ते २०२२ दरम्यान प्रत्येकच महिन्यातले Shorts व्हिडिओवरील व्ह्यू गणले जातील.

# पात्रता?

Shorts Bonus साठीची पात्रता ही दरमाह रिफ्रेश होईल. म्हणजे, जरी तुम्ही या महिन्यात Shorts Bonus साठी Qualify झाला नाहीत तरी, पुढच्या महिन्यात तुम्ही Qualify होऊ शकता. 

म्हणूनच, दर महिन्यात नव – नवीन Shorts बनवून पोस्ट करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

तुम्ही Shorts Bonus साठी कसे पात्र ठराल हे वर नमूद केलेल्या Performance Metrics वरून ठरेल ज्यात Shorts Video वरचे व्ह्यू (View) आणि प्रेक्षक वर्ग कोणत्या ठिकाणाहून आहे हे सांगीतलं गेलं.

# आजवरची YouTube Analytics?

येथे क्लिक करा 👉 YouTube Analytics

# Shorts Bonus Notification कधी प्राप्त होईल?

Shorts Bonus बद्दल सूचित करण्यापूर्वी तुमच्या  चॅनलचे पुनरावलोकन केले जाईल. त्यामुळे काही गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरतील.

०१) चॅनेलवर मागील १८० दिवसांत (६ महिन्यात) स्वतःचे ओरिजनल Shorts अपलोड केलेले असावेत.

०२) निर्मात्यांच्या (Creators) काँटेंटने YouTube च्या Community Guidelines जसे की, Copyright आणि Monetization चे पालन केलेले असावे.

YouTube ची पॉलिसी बघण्यासाठी येथे क्लिक करा 👉 YouTube policies and guidelines – How YouTube Works

०३) थर्ड पार्टीचे वॉटरमार्क्स (Watermarks) किंवा लोगो (Logo) असणारा चॅनेलवरील काँटेंट Shorts Bonus साठी पात्र नसेल.

०४) चित्रपट किंवा टीव्ही शो मधील बिगर संपादित क्लिप (Unedited clips) सारखा कुठलाही Re-uploaded, Non-original Content हा Shorts Bonus साठी पात्र नसेल.

०५) तुम्ही YouTube Shorts Bonus साठी पात्र देशांतून असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर तुम्ही वयाची अट पूर्ण करणे देखील गरजेचे आहे जे तुम्हाला वर दिलेल्या Community Guidelines मध्ये मिळून जाईल. 

तसेच तुमच्या पालकांची किंवा कायदेशीर संरक्षकांच्या परवानगीची देखील आवश्यकता असेल.

# तुम्ही Shorts Bonus साठी पात्र ठरल्यावर?

०१) तुम्ही जर Shorts Bonus साठी पात्र असाल तर, तुम्हाला त्यासाठी दावा करता येईल. 

०२) YouTube कडून तुम्हाला एक ईमेल आणि एक नोटिफिकेशन येईल जो संबंधित दाव्याची विचारणा करणारा असेल.

०३) महिन्याच्या २५ तारखेपर्यंत जर आपण Shorts Bonus दावा केला नाही तर, ते आपोआप एक्स्पायर (Expire) होईल.

०४) प्रत्येक महिन्याला Shorts Bonus साठी दावा करणे आवश्यक ठरेल.

# YouTube Shorts Bonus दावा?

YouTube Shorts Bonus दावा करण्यासाठी खालील दोन स्टेप्स अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.

०१) Accept Terms

Accept Terms केल्यास Shorts Bonus साठीचा दावा अधिकृत केला जाईल.

०२) Link AdSense 

तुम्हाला तुमचा ॲक्टिव AdSense account तुमच्या चॅनेलवर लिंक्ड करावा लागेल. 

AdSense account चॅनेलवर लिंक्ड नसल्यास, तुम्हाला तुमच्या ॲक्टिव AdSense account ला लिंक करण्यासाठी विचारले जाईल किंवा AdSense account अस्तित्वात नसल्यास तो क्रिएट करण्यासाठी विचारले जाईल.

Google AdSense account विषयीच्या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा 👉  Google AdSense account म्हणजे काय? व्हिडिओ लिंक

एकदा Shorts Bonus चा दावा झाल्यास तो कुठल्या स्वरूपात मिळेल?

०१) जर तुम्हाला AdSense account द्वारा याआधी पैसा मिळाला असेल तर, तुम्ही पुढील महिन्याच्या २१ ते २६ तारखे दरम्यान पेमेंट मिळण्याची अपेक्षा करू शकता.

०२) ऑगस्ट मध्ये केलेल्या Shorts Bonus चा दावा सप्टेंबर मध्ये मिळेल.

०३) जर, तुम्हाला कधीच याआधी AdSense account कडून पैसा आला नसेल तर, तुम्हाला तुमचे पेमेंट डिटेल्स पूर्ण करण्याची आवश्यकता असेल.

वरील प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. मात्र, जो पर्यंत पेमेंट जारी केले जात नाही तोपर्यंत तुम्ही Shorts Bonus साठी केलेल्या दाव्याची शिल्लक तुमच्या AdSense account मध्ये राहील.

०४) एकदा का तुमचे AdSense account पेमेंट प्राप्त करण्यासाठी सेट झाले की, तुम्हाला महिन्याच्या २१ ते २६ तारखे दरम्यान पैसे मिळतील.

# MCN?

जर तुम्ही MCN चा भाग असाल तर, तुम्हाला त्यांच्याकडून तुमचे Shorts Bonus पेमेंट मिळेल.

# Shorts Bonus पेमेंट टाईम लाईन रीकॅप!

  • संपूर्ण ब्लॉग मध्ये काही अतिशय महत्त्वपूर्ण बाबी आपण लक्षात ठेवायलाच हव्या! त्या कोणत्या आपण बघूया –
  • जर तुम्ही तुमच्या ऑगस्ट Shorts Performance च्या Bonus साठी पात्र असाल तर, २५ सप्टेंबर पर्यंत दावा करण्याचे तुम्हाला सप्टेंबरच्या सुरुवातीलाच सूचित केले जाईल.
  • एकदा का तुम्ही Bonus दावा करण्याच्या स्टेप्स पूर्ण केल्या तर, तुम्हाला AdSense कडून पेमेंट यायची वाट बघावी लागेल.
  • पेमेंटचे व्यवस्थापन पूर्ण झाले असल्यास तुम्ही महिन्याच्या २१ ते २६ तारखे दरम्यान पेमेंटची अपेक्षा करू शकता.
  • या महिन्यात दावा केलेला Bonus पुढच्या महिन्यात मिळेल.
  • AdSense account मधील पेमेंट डिटेल्स पूर्ण झाल्याशिवाय तुमचे पेमेंट येणार नाही म्हणून, ते पूर्ण करणेच फायद्याचे ठरेल. 

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, ही पूर्ण प्रक्रिया दर महिन्याला परत – परत करावीच लागेल, त्याशिवाय आपण हा लाभ घेऊच शकणार नाही.

तर, मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न मी या ब्लॉगच्या माध्यमातून केलाय. आशा करते आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. 

सोबतच आपले या विषयावर काय मत आहे आम्हाला नक्की कळवा.

त्याचबरोबर, अशा नव नवीन विषयांवर आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या तरुणाई डॉट कॉम या मराठी पोर्टल वर नक्की भेट द्या.


लेखिका

खुशाली ढोके

लेखिका M.com आहेत आणि सध्या महिला सबलीकरण या विषयावर काम करत आहेत.

ईमेल : khushi.dhoke111@gmail.com

अनेकवचन: 2 thoughts on “कमवा युट्युब शॉर्ट्समधून 7.3 लाखांपर्यंत रक्कम! Youtube Short Fund New Update!”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!