Home » आम्ही तरुण

आम्ही तरुण

Reading Time: 2 minutes

मराठी तरुणांनी, मराठी तरुणाईसाठी तयार केलेलं हक्काचं वेब पोर्टल!

आमच्याबद्दल थोडेसे.

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
                      -​संत ज्ञानेश्वर​

तरुणाई डॉट कॉम या मराठी वेब पोर्टलला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
आम्हाला खात्री आहे की, आमची संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडेल. तरुणांनी  तरुणांसाठी तयार केलेलं हे व्यासपीठ बऱ्याच कारणांनी महत्त्वपूर्ण आहे. 

इथे तुम्हाला वाचायला मिळतील:
मराठी जगतात, विशेषतः तरुणांच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी,
ट्रेंडिंग बातम्या,
सेक्स एज्युकेशन,
नोकरीसाठी तयारीच्या टिप्स, जॉब अलर्ट,
पैसा कसा कमवायचा व जपायचा यासंदर्भात मार्गदर्शन,
आणि बरंच काही!

करमणुकीतून शिक्षण या आधुनिक शिक्षणपद्धतीचा वापर करून आपण वेगवेगळ्या विषयावर माहितीपर तसेच मनोरंजक लेख येथे  प्रकाशित करतो.
तुम्ही वाचक असाल तर आम्हाला आपला अभिप्राय नक्की कळवा आणि लेखक म्हणून आमच्याशी जोडलं जायचं असेल तर इथे क्लिक करा.
तरुणाई डॉट कॉम या उपक्रमामागे जसा शैक्षणिक हेतू आहे तसेच सामाजिक धोरण देखील आहे.
आजकालची आपली झिंगाट Gen z किंवा मिलेनिअल्सची पिढी तशी पाहिली तर खूप भाग्यवान मानायला हवी. तंत्रज्ञान व सुख सुविधांचा तुटवडा नसल्यानं जीवनमान उंचावलेलं आहे. एका क्लिकवर सर्व उपलब्ध आहे.
परंतु तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर, योग्य काळात दिशा व मार्गदर्शन न मिळाल्यानं खूप मोठ्या संकटात आपली पिढी अडकलेली आढळते. निराशावाद, ध्येयहिन जीवन, स्ट्रेस, नात्यांची राखरांगोळी व व्यसन, इ. सगळ्या विघातक गोष्टींना आपण तोंड देत आहोत.
 या सर्व गोष्टी लक्षात घेता, करमणुकीतून शिक्षण ह्या धर्तीवर तरुणाई डॉट कॉम हे वेब पोर्टल शैलेश भोकरे उर्फ नवनीता यांनी २० जुलै २०२०, मंगळवार (देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा) रोजी सुरू केले.

तरुणाई डॉट कॉम सुरू करण्यामागे बरीच ध्येयधोरणं आहेत. 
त्यातली काही आवर्जून आम्हाला इथे सांगावीशी वाटतात:

१. मराठी भाषेत जास्तीतजास्त जीवनोपयोगी कन्टेन्ट उपलब्ध होण्यास या पोर्टलमुळे मदत होईल.

२. जास्तीत जास्त मराठी तरुणांपर्यंत या माध्यमातून काही महत्त्वाचे संदेश पोहोचवता येतील.

३. करमणुकीतून शिक्षण हे ध्येय साध्य होईल.

४. जास्तीत जास्त मराठी लेखक तयार तसेच  लिहिते होतील.

५. मराठी भाषेचा वारसा प्रामुख्याने पुढच्या पिढीकडे, त्यांना झेपेल अशा पद्धतीने सोपावता येईल.

तरुणाई डॉट कॉम या उपक्रमाबद्दल मराठी वाचकांचा आणि लेखकांचा फीडबॅक आमच्यासाठी खूप सुखद आहे. या सुंदर प्रतिसादाबद्दल सर्वांचे खूप खूप आभार!
जय महाराष्ट्र!

संपादकीय

तमाम सहा कोटी मराठी माणसांनी ठरवलं तर आपण जग हलवू शकतो, पण सध्या एक साधं तरुणांसाठीचं व्यवस्थित जीवनोपयोगी माहिती असलेलं पोर्टल सापडत नाही.
म्हणून तरुणाई डॉट कॉम!!

चिंतामणी हाताला लागला आणि त्याचा कसा वापर करायचा हे माहित नाही! अशी आपली सगळ्यांचीच तंत्रज्ञानाच्या बाबतीत अवस्था आहे.
तरुण मराठी वाचक इंटरनेटवर कोणतीही माहिती हवी असल्यास इंग्रजीचा आधार घेतात. आपले उत्तमोत्तम लेखक फुकटात कुठेतरी Whatsapp Whatsapp खेळतात.
सोशल मिडियावर आजकाल वाचायला मिळणाऱ्या मिश्कील पण कल्पक व सृजनशील शिव्या असलेल्या कमेंट्स पाहून वाटतं यांचं हे POTENTIAL वाया तर जात नाहीये.
म्हणून तरुणाई डॉट कॉम!!

या, वाचा, शिका आणि लिहा!


शैलेश भोकरे (नवनीता)
संस्थापक, मुख्य संपादक
तरुणाई डॉट कॉम

लेखक नोंदणी

तरुणाई डॉट कॉमवर तुमचं साहित्य प्रकाशित करून दर महिन्याला सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार व रोख पारितोषिक मिळवा!